मुख्य बातम्या मोबाईल

साताऱ्याचा खासदार निवडून आणण्याची जबाबदारी निता केळकरांच्या टीमवर! 

सरकारनामा ब्युरो

सातारा: भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मायक्रो प्लॅनिंग केले असून सातारा मतदारसंघात कोअर टीम तयार केली आहे. उमेदवार सूचविण्यापासून त्याला निवडून आणेपर्यंतची जबाबदारी या टीमवर आहे. आता आम्ही लाभार्थी संपर्क आणि बुथ सक्षमीकरणावर भर देणार आहोत, अशी माहिती भाजपच्या सातारा लोकसभेच्या प्रभारी निता केळकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

केळकर म्हणाल्या, सातारा लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेल्या कोअर टीमची बैठक आज साताऱ्यात झाली. यामध्ये विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. या टीममध्ये मी स्वत: तसेच विक्रम पावसकर, भारत पाटील, अनिल देसाई, मनोज घोरपडे, दीपक पवार, अविनाश फरांदे, सुवर्णा पाटील, कविता कचरे यांचा समावेश आहे. टीमच्या संयोजकपदी ऍड. भारत पाटील तसेच कायदेशीर सल्लागार म्हणून ऍड. प्रशांत खामकर, ऍड. अमित कुलकर्णी, सोशल मिडियासाठी दिग्विजय सुर्यवंशी, संदीप भोसले यांची तर प्रिंट मिडियाची जबाबदारी अनिल देसाई, अविनाश फरांदे यांच्यावर देण्यात आली आहे. 

लाभार्थी सूची संपर्कपदी सुवर्णा पाटील, कविता कचरे, विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी यांचा समावेश असून विस्तारकपदी शेखर वडणे यांचा समावेश आहे. सातारा लोकसभेसाठी कोणाच्या नावाची चर्चा झाली आहे का, या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या, आतापर्यंत पक्षातंर्गत अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. बाहेरून पक्षात येणाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क ठेवला आहे. खासदार उदयनराजेंशी काही याबाबत चर्चा झाली आहे का, असे विचारले असता त्यांनी नाही असे सांगून त्यादिवशीची आमची सदिच्छा भेट होती, असे त्यांनी सांगितले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT