Tanaji Jaybhav
Tanaji Jaybhav 
मुख्य बातम्या मोबाईल

महापालिकेने तातडीने कोरोनाचे बेड वाढवावेत 

सरकारनामा ब्युरो

नाशिक : सध्या कोरोनाचा संसर्ग सतत वाढत आहे. बेड उपलब्ध नसल्याने नव्या रुग्णांना रुग्णालयांत दाखल करून घेतले जात नाही. अशी आणिबाणीची स्थिती असतांना महापालिकेचे प्रशासन, पदाधिकारी काय करीत आहेत? असा प्रश्‍न सामान्य नागिरकांना हैरान करीत आहे. ही स्थिती राहिली तर आठवड्याभराने काय होईल?. याचा विचार करून महापालिका प्रशासनाने तातडीने खाजगी व अन्य रूग्णालयांना कोविड व नॉन कोविड रुग्णांचे बेड वाढविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक ऍड तानाजी जायभावे यांनी केली. 

यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्‍य झाले नाही. महापालिका आयोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. शहरातील रुग्णालयांची सविस्तर माहिती देऊन त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. मात्र सध्या ज्यांनी निर्णय घ्यायचे ते प्रशासन व लोकप्रतिनिधी प्रश्‍न सोडविण्याएैवजी तक्रारी करीत आहे. यातून एक तर ते असहाय्य झाले आहेत, किंवा त्यांना प्रश्‍न कसे सोडवावेत याचा अनुभव नसावा असे चित्र नागरिकांत जात आहे. हे योग्य नाही. त्यामुळे नागिरकांना दिलासा कोण देणार? असा प्रश्‍न त्यांनी केला. 

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, ऍड जायभावे यांच्याकडे सिडको तसचे शहरातील अनेक नागिरक सध्याच्या कोविडच्या अडचणीत मदत मागण्यासाठी जातात. अनेक नागरिक दुरध्वनी करतात. त्यांच्याकडून येणारी माहिती अतिशय उद्वीग्न करणारी असल्याचे त्यांनी सांगितले. "एचएएल'चे एक निवृत्त अधिकारी कोरोनाग्रस्त झाल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी ते विविध रुग्णालयांत गेले. मात्र सगळीकडे जागा नाही, असे उत्तर मिळाले. "एचएएल' आणि सह्याद्री रुग्णालयाचा करार असल्याने एचएएल'चे सध्याचे व निवृत्त कर्मचारी यांच्यावर उपचाराची सुविधा येथे आहे. मात्र या रुग्णालयात केवळ पंचवीस बेड आहेत. त्यात रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मोठ्या रुग्णालयांत ेदखील कोविडसाठी अतिशय मोजके बेड आहेत. रुग्णांची सध्याची संख्या, दैनंदीन संसर्गामुळे रुग्णांची होणारी वाढ आणि भविष्यातील निर्माण होणारी स्थिती याचा अंदाज विचारात घेता. महापालिकेने आत्ताच पुरेसे बेड, औषधोपचार, वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध केले पाहिजे. विशेषतः शहरातील खाजगी वैद्यकीय संस्था व रुग्णालयांत रुग्णांसाठी बेडची वाढीव मागणी तातडीने मंजुर करावी. सर्व 

रपग्णालयांत भेट देऊन तेथील परिस्थितीत पहावी. ज्यांनी मागमी केली नसेल त्यांना बेडची संख्या वाढविण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा ज्या गतीने कोरोनाचा प्रसार व रुग्णसंख्या वाढते आहे, त्यातून गंभीर समस्या निर्माण होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला. 
... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT