Suraj Mandhare
Suraj Mandhare 
मुख्य बातम्या मोबाईल

बाजार समितीत कोरोना चाचणीची सक्ती नाही

सरकारनामा ब्युरो

नाशिक : लॉकडाउनमधील कडक निर्बंध आजपासून शिथिल होत आहे. (lockdown condition loose from today) बाजार समित्यांमधील लिलाव सुरू होतील. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना बाजार समितीत (Nocovid19 test not compultion) येताना आठ दिवसांनी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार, अशी माहिती पसरवण्यात येत आहे. प्रत्यक्षात कोरोना चाचणीची कोणतिही सक्ती नाही, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी स्पष्ट केले. 

बाजार समिती सुरू करण्यापूर्वी घ्यावयाच्या दक्षतेच्या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत शेतकऱ्यांच्या कोरोना चाचणीची कोणतीही अट घालण्यात आली नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. बाजार समितीच्या आस्थापनेमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर अथवा रॅपिट चाचणी १५ दिवसांच्या आत करून घेणे आस्थापनेवर बंधनकारक राहील, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

बाजार समिती आवारात प्रवेश करण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग असावा. संपूर्ण बाजार समिती आवारात रोज नियमितपणे सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात यावी. बाजार समितीच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी व्यक्तीचे तापमान नोंदवण्याची आणि मास्क योग्य प्रकारे लावला आहे अथवा कसे? याची तपासणी करण्याची व्यवस्था आवश्‍यक राहील. बाजार समितीतून विविध गावांतून व्यक्ती येत असल्याने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शेतमाल घेऊन जाणाऱ्या व्यक्तींपैकी अधिकाधिक व्यक्तींची कोरोना चाचणी करणे बाजार समितीवर बंधनकारक असेल.

बाजार समितीच्या आवारात तपासणीची सुविधा बाजार समितीने उपलब्ध करायची आहे. शारीरिक अंतर आणि कोरोनाविषयक प्रतिबंधक उपाययोजनेचे पालन करावे. उपलब्ध जागेनुसार प्रत्यक्ष प्रवेश दिला जावा, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

अधिसूचनेतील काही मुद्दे
* बाजार समितीत किरकोळ शेतमाल खरेदी-विक्री व्यवहार बंद
* विश्राम व्यवस्थेची स्वच्छतागृह आणि इतर ठिकाणी गर्दी होऊ नये
* बाजार समितीने अहवाल जिल्हा उपनिबंधकांना द्यायचा
* कोणत्याही मुद्यांचे उल्लंघन झाल्यास आस्थापना बंद ठेवल्या जातील
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT