Mumabi Municipal Corporation
Mumabi Municipal Corporation 
मुख्य बातम्या मोबाईल

मुंबई महापौरपदाच्या उमेदवाराबाबत काँग्रेसचे अद्याप ठरेना

सुमित सावंत

मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी निवडणूक होणार असून निवडणुकीसाठी उमेदवार द्यावा किंवा नाही किंवा कोण द्यावा याबाबत अद्याप पक्षश्रेष्ठींकडून निर्णय आलेला नाही. तो निर्णय आल्यानंतर काय ते ठरेल असे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.

ते म्हणाले, "काँग्रेस महापौरपदाचा फॉर्म भरण्याच्या तयारीत आहे, उमेदवार कोण असेल याची छाननी अद्याप सुरु आहे. मात्र, हायकमांडच्या निर्णयाची वाट पहात आहोत. हायकमांडकडून फॉर्म दाखल न करण्याचा आदेश आला, तर काँग्रेस महापालिका महापौर पदासाठी उमेदवार देणार नाही. भाजप नेत्यांकडून दोन दिवसांपूर्वी पाठिंबा मागण्यासाठी फोन आला होता.  मात्र, आम्ही स्पष्ट नकार दिला. आज दुपारी 3 वा. काँग्रेस नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. बैठकीनंतर काँग्रेस उमेदवार देणार की नाही हे हायकमांडच्या निर्णयावरुन ठरवले जाईल,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT