now congress mahapardafash rally
now congress mahapardafash rally 
मुख्य बातम्या मोबाईल

आता कॉंग्रेसतर्फे महापर्दाफाश यात्रा 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कॉंग्रेस पक्ष राज्यभर महापर्दाफाश सभांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खोटारडेपणाची पोलखोल करणार असून सोमवार 26 ऑगस्ट रोजी अमरावती येथे पहिली महापर्दाफाश सभा होणार आहे. 

राज्याच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमूख आणि माजी खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत होत असलेल्या या शुभारभांच्या सभेस ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व राज्यसभेतील विरोधीपक्षनेते गुलाम नबी आझाद, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, के. सी. पाडवी, विरोधी पक्ष नेते विजय वड्डेट्टीवार, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ आदी नेते यावेळी उपस्थित राहाणार आहेत. 

प्रदेश कॉंग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे मुख्य समन्वयक आणि प्रवक्ते डॉ संजय लाखे पाटील यांनी सांगितले, की पहिल्या टप्प्यात विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात विविध ठिकाणी महापर्दाफाश सभा होणार आहेत. पुढच्या टप्प्यात मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र , कोकण- मुंबई या विभागात सभा होणार आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT