Corona Fear
Corona Fear 
मुख्य बातम्या मोबाईल

कोरोना बाधितांची या जिल्ह्यातील संख्या 122 वर ; बहुतेक बाधितांचा पुणे, मुंबईचा प्रवास

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : जिल्ह्यातील सलग सातव्या दिवशी 39 कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याची माहिती सीपीआर वैद्यकीय यंत्रणेने दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 122 वर पोहचला आहे. बीजे मेडीकल कॉलेज पुणे येथून अहवाल आले आहेत.

या सर्वांवर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील 90 टक्के व्यक्तींनी मुंबई, पुण्यासह अन्य जिल्ह्यातून प्रवास केल्याचा संदर्भ आहे. बहुतेक सर्व व्यक्ती मेडीकल क्वारटाइन असल्याने समाज संसर्ग टाळण्यास मदत झाली आहे.

गेल्या सात दिवसापासून परजिल्ह्यातील विशेषतः मुंबई, पुणे येथून अनेकजण आपल्या गावी येत आहे. बहुतेकजन सीपीआर रूग्णालय, महापालिका आयसोलेशन हॉस्पीटल, सावित्रीबाई फुले रूग्णालय येथे तपासणी करीत आहेत.

येथे घेण्यात आलेले स्वॅब तपासणीसाठी शेंडापार्क शासकीय प्रयोग कोल्हापूर, बी. जे. मेडीकल कॉलेज प्रयोगशाळा पुणे व शासकीय प्रयोगशाळा मिरज येथील शासकीय प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. त्यांचे अहवाल टप्प्या-टप्प्याने प्राप्त झाले होत आहेत.

मंगळवारी शेंडापार्कातील प्रयोगशाळेतून पहिले चार कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आले. तर बीजे मेडीकल कॉलेज पुण्यातून आलेल्या अहवालात 35 कोरोना बाधित आलेत. त्यामुळे सोमवारचे 83 अधिक  मंगळवारी 39 अशी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 122 झाली आहे.

यात मंगळवारी कोरोना पॉझिटीव्ह आलेले 25 पुरूष 14 महिलांचा समावेश आहे. अन्य एकूण 77 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 1 हजार 176 स्वॅब तपासणीसाठी पाठवलेले आहेत. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाहीत.

सर्वांवर सीपीआरमध्ये उपचार

दिवसभरात कोरोना पॉझिटीव्ह आलेले रूग्ण बहुतांशी ग्रामीण भागातील आहे. यातही मुंबई, ठाणे, रायगड, सोलापूर, पूणे याभागातून ते गावी आले आहेत. त्यापैकी सर्वांची तपासणी झाली आहे. त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारटाइन करण्यात आले होते. त्यानुसार बहुतेकजण ग्रामीण भागातील प्राथिमक शाळामध्ये किंवा रिकाम्या घरात थांबून होते. त्यातील ज्यांचे स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांना जिल्ह्यातील बारा 108 रूग्णवाहिकातून सीपीआर रूग्णालयात आणण्यात आले.

मंगळवारी आढळलेले या गावात कोरोनाग्रस्त


मादळे (पन्हाळा), पाटगाव (भुदरगड), एम्मेटी, काळ्ळमावाडी (ता. राधानगरी), भादवन (आजरा), नेसरी (गडहिंग्लज) विक्रम नगर (करवीर) येथील आहेत.

गेल्या 46 दिवसातील स्थिती अशी 

  1. जिल्ह्यात आज अखेर एकूण 122 व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह.
  2. यापैकी सद्या 112 कोरोनाग्रस्तांवर सीपीआर मध्ये उपचार सुरू आहेत.
  3. 9 कोरोनाग्रस्त व्यक्ती गंभीर आहेत.
  4. तर 12 व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या आहेत.
  5. आजच्या दोघांवर पॉझिटीव्ह रूग्णावर आयजीएम उपचार होत आहेत.
  6. एकूण दोन कोरोनाग्रस्त व्यक्तींचा मृत्यू झाला.

सोमवारपर्यंत कोरोनाग्रस्तांची तालुकानिहाय संख्या  

आजरा - 6
भुदरगड - 9
चंदगड -4
गडहिंग्लज - 3
गगनबावडा -0
हातकणगले -0
कागल -1
करवीर - 2
पन्हाळा - 8
राधानगरी -9
शाहूवाडी -18
शिरोळ - 1
इचलकरंजी - 6
कोल्हापूर शहर - 13
अन्य जिल्ह्यातील - 3

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT