4sanjay_raut_6may_2f.jpg
4sanjay_raut_6may_2f.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

संजय राऊत यांच्यावरील महिलेने केलेल्या आरोपांच्या चौकशीचे आदेश 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात स्वप्ना पाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुंबई पोलिस आयुक्तांनी तातडीनं लक्ष घालत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. Order to file a petition against Sanjay Raut

स्वप्ना पाटकर यांनी क्लिनिकल सायकॅालॅाजिस्ट म्हणून बनावट पदवी मिळवून त्याव्दारे रुग्णालयात नोकरी मिळवली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांना काही दिवसापूर्वी अटक करण्यात आली होती. गुरूदीप कैार यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांच्यावरुन पाटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानपूर विद्यापीठाकडून  त्यांना ही बनावट पदवी मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

पाटकर यांनी स्वतःला डॅाक्टर असल्याचे भासवून जनतेची फसवूक केली असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पाटकर या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील प्रदर्शित झालेल्या  "बाळकडू " या सिनेमाच्या निर्मात्या आहेत.  पाटकर यांनी काही दिवसपूर्वी टि्वट करुन संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. राऊत हे सरकारी यंत्रणेचा गैरवापर करुन मला धमक्या आणि शिवीगाळ करीत असल्याचा आरोप  पाटकर यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांना त्यांनी टॅग केलं होते. 
 
विजय शिवतारेंच्या पत्नीचे गंभीर आरोप  ; २७ वर्षापासून माझ्यापासून अलिप्त 
 
पुणे : माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ते सध्या आयसीयूमध्ये  (ICU) आहेत. त्यांच्या कन्या ममता लांडे-शिवतारे यांनी याबाबत कौटुंबिक वादाबाबत फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. याला विजय शिवतारे यांची पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी हे आरोप खोडले आहेत. त्यांनी फेसबूक लाईव्ह करीत या आरोपांना उत्तर दिले आहे.  मंदाकिनी शिवतारे म्हणतात, "माझी मुलगी ममता शिवदीप लांडे- शिवतारे यांनी केलेली पोस्ट वाचली. तिने माझा मुलगा विनय आणि विनस यांच्याविरोधात केलेले आरोप खोटे आहेत. वास्तविक पाहता गेल्या २७ वर्षापासून माझे पती विजय शिवतारे हे कुंटुबियांपासून अलिप्त राहत आहेत. त्यातील पहिली पाच वर्ष ते उज्ज्वला बागवे हिच्यासोबत लग्न करुन राहत होते. त्यांच्यानंतरची आजतागायत ते मिनाश्री पटेल हिच्यासोबत पवई येथे वास्तव्यास आहेत." 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT