Pankaja Munde demands enquiry over pooja chavan sucide
Pankaja Munde demands enquiry over pooja chavan sucide 
मुख्य बातम्या मोबाईल

पंकजा मुंडे म्हणाल्या... पूजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील, तिच्या मृत्यूची चौकशी करा!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पुण्यात पूजा चव्हाण या तरूणीने रविवारी आत्महत्या केली आहे. याप्रकरणात विदर्भातील एका मंत्र्यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यावरून भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत.  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ही तरूणी आपल्या मतदारसंघातील असल्याचे सांगत सखोल चौकशीची मागणी केली आहे. 

पूजा चव्हाण आत्महत्येवरून भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यांच्या प्रकरणातील दबंगगिरी सहन केली. त्यावर ते शांत बसले. आता ते आपल्याच पक्षातील मंत्र्याच्या प्रकरणातील दादागिरी की 'राठोडगिरी' सहन करणार का, असा सवाल करीत ‘राठोडगिरी’ हा शब्दाचा उल्लेख करून त्यांनी सेनेच्या एका मंत्र्यावर थेट निशाणा साधला आहे.

पंकजा मुंडे यांनीही ट्विट करून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. 'पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरूणीचा मृत्यू ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. हया तरूणीच्या मृत्यूची  सखोल चौकशी झाली पाहिजे', असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. एक तरुणी आत्महत्या करते. त्या प्रकरणातील सत्य काय आहे, हे पोलिसांनी शोधून काढले पाहिजे. पुणे पोलिसांनी या प्रकरणातील सत्य शोधून ते जनतेसमोर आणावे, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, भातखळकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्र्यांपासूनच महिलांना धोका आहे. कोणी बलात्काराची तक्रार करते, तर कोणी आपली मुलं मंत्र्यांनी पळविल्याची तक्रार करते. आता तर मंत्र्यांमुळे तरुणी आत्महत्या करायला लागल्या आहेत. यांच्या दबावामुळे नातेवाईक तक्रार करायला पुढे येत नाहीत. रक्षकच भक्षक बनले आहेत, असे सणसणीत आरोप भातखळकर यांनी केला. तसेच पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.   

पूजा चव्हाण प्रकरण काय?

पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण नावाच्या 23 वर्षांच्या तरुणीने रविवारी (७ फेब्रुवारी) रात्री इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. मूळची बीड जिल्ह्यातील असलेली पूजा दोन मुलांसोबत वानवडी भागात फ्लॅटमध्ये राहत होती. रविवारी रात्री मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर तिने इमारतीवरून उडी मारली होती.

पूजा चव्हाण ही तरुणी काही दिवसांपूर्वीच पुण्यात इंग्लिश स्पिकिंग क्लाससाठी आली होती. तिच्या आत्महत्येनंतर तिचे आणि तिच्या मित्राचे राज्य सरकारच्या एका मंत्र्यांसोबतचे सार्वजनिक कार्यक्रमातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे भाजपकडून पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, संबंधित मुलीचे भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सर्व गोष्टीमुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गूढ वाढले आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT