pankaja24.jpg
pankaja24.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

पंकजा मुंडेंची वाटचाल ओबीसी राजकारणाकडे...

सरकारनामा ब्युरो

पुणे: जातिनिहाय जनगणनेबाबत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्याचा विधानामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०२१ ची जनगणना जातिनिहाय व्हावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधले ओबीसी नेते जातिनिहाय जनगणनेची मागणी करताना दिसतात, पण त्या पक्षांचे नेतृत्व जातिनिहाय जनगणनेच्या मागणीकडे दुर्लक्ष करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी केलेल्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांनी याबाबत टि्वट केले आहे.

पक्षनेतृत्त्व पंकजांनी केलेल्या या मागणीकडे कसे बघते आणि त्याला कसा प्रतिसाद देते, हे पाहणे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहे. जनगणनेच्या मुद्द्यावर भाजपने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. 

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे काही काळ ओबीसी राजकारणासाठी एकत्र आले होते. छगन भुजबळ यांनी २००० च्या दशकातमध्ये जातनिहाय जनगणनेची मागणी प्रभावीपणे लावून धरली होती. ओबीसी नेते म्हणून त्यांना त्यावेळी पुढे यायचे होते. त्यांनी त्यावेळी बिहारमध्ये मोठा ओबीसी मेळावाही घेतला होता. या मेळ्यावाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते. यावेळी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलून धरण्यात आला होता. त्यानंतर आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ही मागणी केल्यामुळे त्यांचा प्रवास ओबीसींचे नेतृत्व करण्याकडे होतो की काय अशी शक्यता नाकारता येत नाही.
Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT