Pankaja Munde .jpg
Pankaja Munde .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

करूणा मुंडे प्रकरणानंतर पंकजा मुंडे याचे सूचक ट्विट  

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : परळीत पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेल्या करुणा मुंडे (Karuna Munde) यांच्या कारमध्ये गावठी पिस्तुल सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. वैद्यनाथ मंदिर परिसरात आलेल्या करूणा मुंडे यांचा दर्शनासाठी आलेल्या महिलांशी वाद झाला. यावेळी काही महिलांनी करूणा मुंडे यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत पोलीसांकडे धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता. न्यायालयने त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावरुन आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सुचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Pankaja Munde's suggestive tweet after Karuna Munde case)  

या संदर्भात पंकजा मुंडे यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये पंकजा म्हणाल्या की ''अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही. पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, wrong president should not be set! ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची !!'' अशा शब्दात त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.   

दरम्यान, परळी शहरात रविवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते. करुणा मुंडे यांनी काही दिवसांपुर्वी सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत परळीत पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेत आपण आपले पती व इतरांच्या विरोधात अनेक पुरावे सादर करून काही गोष्टींचा व षडयंत्राचा खुलासा करणार असल्याचे सांगितले होते.

त्यानूसार करूणा मुंडे या रविवारी दुपारी परळीत दाखल झाल्या होत्या. वैद्यनाथ मंदिर परिसरात दर्शन घेऊन जात असतांनाच त्यांची मंदिर परिसरात काही महिलाशी बाचाबाची झाली. यावेळी करूना मुंडे यांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार एका महिलेने शहर पोलिसांत दाखल केली होती. त्यानूसार पोलिसांनी करुणा मुंडे यांच्याविरोधात अॅट्राॅसिटी तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT