manmohan singh8.jpg
manmohan singh8.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

माझं नाही, किमान मनमोहन सिंग यांचे तरी ऐका..मोदींचा काँग्रेसला टोला...

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेत विविध विषयांवर भाष्य करीत विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. कृषी धोरणांबाबत अगोदर पाठिंबा नंतर विरोध करणाऱ्यांवर त्यांनी हल्लाबोल केला. याबाबत मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जुन्या वक्तव्याचा दाखला दिला. त्यांनी काँग्रेसला खडेबोल सूनावले.

शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्याचा अधिकार नसल्याचे व्यक्तव्य मनमोहन सिंग यांनी केलं होतं. कृषी बाजारपेठा खुल्या कराव्यात, असं व्यक्तव्य मनमोहन सिंग यांनी केलं होतं. याचा दाखला देत मोदी काँग्रेसला म्हणाले, "अहो, तुम्हाला अभिमान वाटायला हवा..कृषी धोरणाबाबत मनमोहन सिंग जे बोलले ते मोदीला करावं लागतं आहे, असे तुम्ही म्हणायला हवं. तुम्ही माझं ऐकणार नाहीत, तर किमान मनमोहन सिंग यांचे तरी ऐका."    

 
"कृषी कायद्यातील सुधारणांवर शरद पवारांसह काँग्रेसच्या नेत्यांनी भाष्य केलं. पण कृषी कायद्याला पाठिंबा देणाऱ्यांनी अचानक यु टर्न घेतला," अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली. "चुक झाली तर माझ्या माथी, चांगलं झालं तर त्यांचे श्रेय तुम्ही घ्या. शेतकरी आंदोलन संपवा.. चर्चेसाठी मी तयार आहे, आंदोलन मागे घ्या," असे आवाहन मोदींनी विरोधीपक्ष, शेतकरी संघटनांनी केलं.  

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकलेल्या विरोधकांचा मोदी यांनी  समाचार घेतला. मोदी म्हणाले, "राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेलं अभिभाषण आत्मविश्वास निर्माण करणार आहे. राष्ट्रपतीचं अभिभाषण मार्ग दाखविणार ठरलं. त्यांचे भाषण आत्मविश्वास निर्माण करणारं होत. पण काँग्रेसने देशाला नेहमीच निराश करते"

मोदी म्हणाले की, राष्ट्रपतींचे भाषण देशाला मार्ग दाखवणारं होतं. या भाषणाचं मूल्य खूप आहे. कोरोना संकटात दिवा लावण्याचा उपक्रम एकता सामर्थ्य वाढविण्यासाठी होता, पण काही जणांनी त्यांच्यावरही टीका केली. काँग्रेस देशाला नेहमी निराश करतं. 

भारतातील लोकशाही अजिबात स्वार्थी आणि आक्रमक नाही. 21 वे शतक भारतासाठी प्रेरणादायी आहे. जगभरात आपल्या कोरोना लसींची चर्चा आहे. 150 देशांना ओैषधे पुरविण्याचे काम भारताने केलं आहे.  कोरोनाविरूद्ध लढा जिंकण्याचं श्रेय सरकारचं नाही, तर संपूर्ण देशाचं आहे, असं मोदी म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT