Pawarsaheb, until then say the government to postpone the MPSC exam
Pawarsaheb, until then say the government to postpone the MPSC exam 
मुख्य बातम्या मोबाईल

पवारसाहेब, ...तोपर्यंत सरकारला MPSC परीक्षा पुढे ढकलायला सांगा 

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार विनायक मेटे यांनी पुण्यात आज (ता. 3 ऑक्‍टोबर) मराठा विचार मंथन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत 25 ठराव पारित करण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात. तसेच, राज्य सरकारने ऑक्‍टोबर अखेरपर्यंत मागण्या पूर्ण न केल्यास एक नोव्हेंबरपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा मेटे यांनी या वेळी दिला. 

दरम्यान, पुण्यातील मराठा विचार मंथन बैठकीसाठी मेटे यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र या दोन्ही राजांनी बैठीककडे पाठ फिरवली. याबाबत मेटे म्हणाले की पुण्यातील मराठा विचार मंथन बैठकीसाठी खासदार उदयनराजे येणार होते. परंतु ते बैठकीला का येऊ शकले नाहीत, माहिती नाही. 

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्यापासून मराठा समाजातून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील सर्व घटकांना एकत्रित करण्यासाठी मेटे यांनी शनिवारी (ता. 3) विचार मंथन बैठक बोलावली होती. या बैठकीस राज्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे हे बैठकीला न येण्याबाबत विचारले असता मेटे म्हणाले की, उदयनराजे मला येतो म्हणाले होते. पण ते का आले नाहीत, माहिती नाही. परंतु साताऱ्यात ते लवकरच आरक्षणाबाबत बैठक आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी विनंती शरद पवार यांना करीत आहे. कारण हे सरकार पवार यांचा शब्द खाली पडू देत नाही. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत एमपीएससीच्या परीक्षा स्थगित न केल्यास 9 ऑक्‍टोबर रोजी मुंबईत राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

...म्हणून ईडब्लूएस आरक्षणाबाबत ठराव नाही 

काही मराठा संघटनांच्या नेत्यांनी ईडब्लूएस (EWS) प्रवर्गातील कोट्यातून आरक्षण नको, अशी भावना व्यक्त केली. परंतु याबाबत एकमत झाले नाही, त्यामुळे हा ठराव पारित करण्यात आला नाही, असे मेटे यांनी या वेळी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT