modi-diya
modi-diya 
मुख्य बातम्या मोबाईल

नरेंद्र मोदींनी आवाहन केलं...जनतेन करून दाखवलं! #9बजे9मिनट

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आणि जनतेने त्याला भरभरून प्रतिसाद दिला नाही, असे आतापर्यंत कधीच घडले नाही. कोरोनाच्या लढाईविरोधात पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी विजेवरील दिवे बंद करून पणत्या, मेणबत्त्या पेटवा या त्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळाला. जनतेची एकजूट या निमित्ताने पाहावयास मिळाली.

अनेकांसाठी हा भावनिक क्षण ठरला. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत काहींना हा प्रसंग साजरा केला. विशेष म्हणजे विजेच्या जाळ्यावर कोणताच ताण आला नाही. विजेची मागणी अचानक कमी होऊन आणि वाढूनही मोठी अडचण आली नाही. सारे सुरळीत पार पडल्याने वीज अभियंत्यांनी आणि त्यातही लोड डिस्पॅच सेंटरमधील अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

अनेक केंद्रीय मंत्री, भाजपचे पदाधिकारी, राज्यातील नेते यात सहभागी झाले होते. अनेक सोसायट्यांचे रात्री नऊच्या आधीचे दृश्य आणि त्यानंतर नऊ मिनिटांचे दृष्य हे अनेकांनी शेअर केले. कोरोनाच्या लढाईत मानसिक आधार देण्याचे काम अशा मोहिमांमधून झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. पोलिस दलाचे जवान, रुग्णालयातील कर्मचारी यांनीही यात सहभाग घेतला. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही पणती पेटवत जनतेसोबत सहभाग घेतला. मोदी यांचे विरोधक असलेल्या चंद्राबाबू नायडू, के.सी. आर. राव यांनीही सक्रिय पाठिंबा दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT