2Rajesh_
2Rajesh_ 
मुख्य बातम्या मोबाईल

आरोग्यमंत्र्यांसमोरच लोकप्रतिनिधींनी आयएमएला पाडले तोंडघशी...

सरकारनामा ब्युरो

अकोला : अकोल्यात ९३ टक्के खासगी रुग्णांलयाची ओपीडी सुरू असल्याचा दावा इंडियन मेडिकल्स असोसिएशन (आयएमए) ने केला होता. मात्र, हा दावा चक्क आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमोर अकोल्यातील पत्रकार, नागरिक, आणि लोकप्रतिनिंधी खोटा ठरवित आयएमएला तोंडघशी पाडले. जर खासगी रुग्णालये बंद असतील त्या डॉक्टरांची परवाने रद्द करा अशा सूचनाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात गुरुवारी (ता.३) आयोजित पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्र्यासमोर अकोल्यातील खासगी रुग्णालय शंभर टक्के बंद असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी मांडली. ते बोलत असताना आयएमएचे प्रतिनिधींनी ‘नाही आमची ओपीडी सुरू असल्याचा दावा केला. मात्र, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर आणि उपस्थित पत्रकारांनी ‘साहेब हे खोटे बोलत आहेत. आतापर्यंत एकही दवाखाना उघडा नाही, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांना दिली. यावेळी वातावरण चांगलचे तापले होते. मात्र, यावेळी आरोग्यमंत्र्यांनी आयएमएच्या सदस्यांच्या अडचणी जाणून घेत आयएमएला दोन हजार पीपीई किट्स द्या, त्यांना अन्य सुविधा द्या आणि रुग्णालय सुरू करण्यास सांगा. मात्र, यांनतरही रुग्णालय बंदच राहले तर त्यांचे परवाने रद्द करा अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

आरोग्यमंत्र्यानी धरले मनपासह जिल्हा प्रशासन धारेवर


अकोल्यात सर्वाधिक रुग्ण हे महानगरपालिका हद्दीत आहेत. ही रुग्णसंख्या घटण्याऐवजी ती वाढतच आहे. याला जबाबदार कोण ? याचा विचार करण्यात आता वेळ घालवू नका, महानगरपालिकेने स्वतःचा क्षमता वाढवावी आणि वाढत असलेली रुग्णसंख्या कमी करण्यास मदत करावी. यासाठी वाटेल ती मदत करण्यास तयार आहोत. मनपा आयुक्तांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे, असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. ते येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात गुरुवारी (ता.४) आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी त्यांनी महानगरपालिकेला सूचना केल्या आहेत.  

आरोग्यमंत्र्याकडून मनपाला सूचना

  1. मृत्यूदर हा कमी होण्यासाठी शेवटच्या क्षणी रुग्णालयात येणाऱ्यांना नागरिकांसाठी जनजागृती करा, त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरा.
  2.  रेडिओलॉजिस्ट, स्क्रीनिंगची संख्या वाढवा. मनपाकडून डिटेक्शन कमी केले जाते. ते वाढवावे, सोबतच प्रतिबंधित क्षेत्र आणि त्या बाहेरील नागरिकांचे सर्वेक्षण करा.
  3.  महानगरपालिकेने स्वतःचे फिव्हर क्लिनिक वाढवावे. जेणेकरून नागरिक बाहेर खासगीमध्ये उपचार घेणार नाहीत. आणि रुग्ण आढळण्यास मदत होईल.
  4. आता रुग्णवाढ होत नाही. तर याउलट ३४ झोनमधून रुग्ण बाहेर येत आहेत. तेव्हा पोलिसांनी आता ९२ झोनमध्ये अडकून न राहता ३४ प्रतिबंधित क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करावे.

अशा दिल्या जिल्हा प्रशासनाला सूचना

  1.  जीएमसीकडे फिजिशीयन, भूलतज्ज्ञांची संख्या कमी आहे तर आयएमएकडू प्रत्येक ५० डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत करावी, अधिग्रहीत केलेल्या डॉक्टरांची सेवा आठवड्यातून दोन दिवस ठेवावी.
  2.  अकोल्यात बेडची संख्या कमी आहे असे लक्षात आले आहे. तेव्हा अकोल्यात पुढील काही दिवसांत जास्तीत जास्त आॅक्सीजनयुक्त बेडची संख्या वाढवावी 
  3.  अकोल्याच्या आरोग्य विभागात ९५८ रिक्त पदे आहेत. ती पदे भरण्याची सर्वस्वी जबाबदारी स्थानिक प्रशासनाला दिली आहे. 
  4. जीएमसीमधील अस्वच्छतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, चतूर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरा, कर्मचारी संख्या वाढवा 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT