Pimpri MLA Mahesh Landge and 26 corporators won the battle against Corona
Pimpri MLA Mahesh Landge and 26 corporators won the battle against Corona  
मुख्य बातम्या मोबाईल

पिंपरीत आमदार महेश लांडगेंसह 26 नगरसेवकांनी जिंकली कोरोनाविरोधातील लढाई

पितांबर लोहार

पिंपरी : कोरोना महामारीच्या सात महिन्यांच्या कालावधीत पिंपरी चिंचवड शहरात सर्व सामान्यांबरोबरच 36 लोकप्रतिनिधींनाही या विषाणूची बाधा झाली होती. यातील एका आमदार आणि 26 नगरसेवकांनी कोरोनावर यशस्वी मात करत पुन्हा जोमाने सक्रीय झाले आहेत. मात्र, विद्यमान तीन, तर माजी सहा अशा नऊ नगरसेवकांचा मृत्यू झाला. 

कोरोनाचा राज्यातील पहिला आणि दुसरा रुग्ण पुण्यात नऊ मार्चला आढळला. संबंधित दांपत्य परदेशातून विमानाने आले होते. त्यांचे सहप्रवासी असलेले पिंपरी-चिंचवड शहरातील तिघांना महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दहा मार्च रोजी दाखल केले होते. या तिघांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आणि कोरोनाने शहरात शिरकाव केला.

आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 85 हजारांवर पोचली आहे. मात्र, त्यावर मात केलेल्यांची संख्या 79 हजार एवढी आहे. सुमारे दीड हजार नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या शहरात साडेचार हजार सक्रिय रुग्ण आहेत, त्यापैकी साडेतीन हजार रुग्ण महापालिका रुग्णालयांत उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्ण होम आयसोलेट व खासगी रुग्णालयात आहेत. 

कोरोनाची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार गेला. त्यांच्या मदतीसाठी काही लोकप्रतिनिधी धाऊन आले. विद्यमान अनेक नगरसेवकांनी जनसंपर्क कार्यालयातून अन्नधान्य, भाजीपाल्याचे वाटप केले. सुरुवातीला औषध फवारणी, रुग्णांना बेड मिळवून देणे, औषधे मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. तसेच स्वत: पीपीई किट घालून थर्मल स्कॅनिंग करण्याचे कामसुद्धा केले.

रुग्णालयास व्हेंटिलेटरपासून ऑक्‍सिजन सिलिंडरपर्यंत वैद्यकीय मदत केली. हे करत असताना एक आमदार व 29 नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 26 नगरसेवकांसह आमदार महेश लांडगे यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर, दुर्दैवाने तीन विद्यमान, तर सहा माजी नगरसेवकांना जीव गमवावा लागला. 

कोरोनावर मात केलेले नगरसेवक 

भाजप : चंदा लोखंडे, शारदा सोनवणे, कमल घोलप, सीमा सावळे, आशा शेंडगे, सुजाता पालांडे, निर्मला कुटे, साधना मळेकर, भीमाबाई फुगे, स्वीनल म्हेत्रे, नीता पाडाळे, उत्तम केंदळे, शैलेश मोरे, विलास मडिगेरी, बाबू नायर, तुषार कामठे, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, सागर अंगोळकर, शशिकांत कदम. 
शिवसेना : राहुल कलाटे, नीलेश बारणे 
राष्ट्रवादी : नाना काटे, शीतल काटे, डब्बू आसवानी, अनुराधा गोफणे. 

 मृत्युमुखी पडलेले नगरसेवक 
लॉकडाऊन काळात गोरगरिब जनतेला सुमारे 15 लाख रूपयांचे अन्नधान्य वाटप करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चिखलीतील नगरसेवक दत्तात्रेय साने यांना कोरोनाची बाधा झाली. त्यात त्यांचा बळी घेतला. राष्ट्रवादीचेच आकुर्डीतील नगरसेवक जावेद शेख यांचाही कोरोनामुळेच मृत्यू झाला. भाजपचे दिघीतील नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचेही कोरोनामुळे निधन झाले. 

 मृत्युमुखी पडलेले माजी नगरसेवक 
जनसेवा करताना लोकांच्या संपर्कात आल्याने माजी नगरसेवक रंगनाथ फुगे, साहेबराव खरात, एकनाथ थोरात, लक्ष्मण गायकवाड, सुलोचना बडे, हनुमंत खोमणे यांना संसर्ग झाला. त्यात त्यांचा बळी गेला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT