corona pune
corona pune 
मुख्य बातम्या मोबाईल

हा आकडा पुणेकरांसाठी महत्त्वाचा! आज उच्चांकी 399 कोरोनाबाधित

सरकारनामा ब्यूरो

पुणे, ता. 25 : पुण्यात आतापर्यंत आवाका वाढविलेल्या कोरोनाने सोमवारी मात्र रुदावतार दाखविला असून, गेल्या 12 तासांत तब्बल 399 रुग्ण सापडले आहेत. आजपर्यंत हा सर्वाधिक आकडा आहे. एवढ्या प्रमाणात रुग्ण सापडले असले तरी; तपासणी मात्र, जेमतेम पावणेसातशे नागरिकांचीही झालेली नाही. एकीकडे तपासणीचे प्रमाण कमी असूनही इतके रुग्ण आढळून आल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यात पुन्हा दहा रुग्णांचा मृत्युही झाला आहेत.

नवे रुग्ण आणि मृतांची संख्या वाढली असताना दिवसभरात पावणेदोनशे रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासाही मानला जात आहे. दरम्यान, विविध रुग्णालयांतील 179 रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील 44 जण व्हेंटिलेटरवर आहेत, असेही आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले. कोरोनाचे रुग्ण बरे होत असल्याने कोरोनाविरोधात पुणेकर पुढे आले आहेत. मात्र, रोज नव्या रुग्णांचे नवनवे आकडे येत असल्याने पुन्हा भीती पसरली आहे.

पुणे शहरात आतापर्यंत 41 हजार 863 नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी झाली असून, त्यातील 5 हजार 181 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे पुृढे आले आहे. त्यातील 2 हजार 735 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 264 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या रुग्णालयांत 2 हजार 182 रुग्ण असल्याचे आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे.

सध्या रोज 1हजार 700 पेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात येत होती. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात होते. सोमवारची 399 रुग्णांची संख्या पुढे आली तेव्हा दोन हजारांपेक्षा अधिक लोकांची तपासणी झाल्याचा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र दिवसभरात 689 इतक्‍याच लोकांची तपासणी करण्यात आली आहे. तरीहीं तपासणी झालेल्यापैकी 57.91 टक्के लोकांना कोरोना झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT