ramdas athwale
ramdas athwale 
मुख्य बातम्या मोबाईल

शीघ्रकवी रामदास आठवले यांच्या कोरोनावरील कविता खास आपल्यासाठी!

सरकारनामा ब्यूरो

रामदास आठवले यांच्या या कविता कशा वाटल्या ते काॅमेन्ट बाॅक्समध्ये जरूर लिहा!

बुद्धाने चीनला शिकविली करूणा
पण चीन मधून कसा आला इथे कोरोना 
भारतातून बौद्ध धम्म चीन मध्ये गेला 
आणि चीन बुद्धमय झाला 
पण आता चीन कोरोनामय झाला 
कोरोनाच्या तोंडावर आपण लावूया ताला
कोरोनाचा साफ करून टाकूया आपण गंदा नाला 
मी तर आहे `जय महाराष्ट्र, जय भारत` `जय भीम`वाला 
मग इथे कसा आला रे हा गद्दार साला 
फेकून देऊया आपण गटारात कोरोनाची भयंकर माला
कोरोनाच्या पोटात घुसवून टाकूया आपण धारदार भाला

            ---- 2 ---

 मनामध्ये सर्वांनीच ठरवा
आणि कोरोनाला आहे तिथेच हरवा 
आपले अंगण स्वच्छ सारवा 
आणि कोरोनाला हाटवा
त्या झाडावरून ओरडतो आहे कोरोनाचा पारवा 
त्याची अचूक शिकार करायची ठरवा 
लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना पोटभर घास भरवा 
पण कोरोनाला जरूर हारवा
जास्त करू नका घरामध्ये गारवा 
आणि घराच्या बाहेर काढू नका गर्दीचा कारवा!

                  --- 3 ---
चला हवा येऊ द्या 
पण कोरोनाला लवकर जाऊ द्या 
`कोरोना मुर्दाबाद`चा नारा मला देऊ द्या
कोरोनाचा बदला मला घेऊ द्या 
आपणच व्हा आपले रक्षक 
कोरोनाचे होऊ नका भक्षक


कोरोनावरील हिंदी कविता*

               ---1 --
कोरोना ने सारे दुनिया को घेर लिया है
भारतने कोरोना को सही उत्तर दिया है
कोरोना ने सारे मानवजाती को परेशान किया है
इस लिये सारे मानव जाती ने कोरोना की तरफ ध्यान दिया है 

सारे दुनिया मे कोरोना ने हाहाकार मचाया है
लेकिन लॉक डाऊन ने भारत को बचाया है 


              - 2 -- 
यहा नाच रहा है कोरोना 
लेकिन इसमें तुम मत हारोना 
कोरोना को मत डरोना 
कोरोना को जलदी मारोना 
सभी लोगोंको जगांना है 
कोरोना को इधर से भगाना है 
सॅनिटायझर और मास्क मंगाना है 
घर घर वालों को जगाना है !

                --- 3 --- 

 कोरोना की बहुत खतरनाक है जात 
मत मिलावो एक दुसरे के हात मे हात
नही तो कोरोना से तुम्हारा हो जयेगा घात 
अगर करनी है तुम्हे कोरोना पर मात 
तो दे दो मा. नरेंद्र मोदीजी को साथ 
कोरोना की ये है अंधेरी रात 
मत पुछो एक दुसरे को अपनी जात!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT