Deepak Pande
Deepak Pande 
मुख्य बातम्या मोबाईल

रुग्णालयांवरील हल्ल्यांमुळे पोलिस आयुक्त झाले अलर्ट !

सरकारनामा ब्युरो

नाशिक : कोरोनाचा प्रसार व त्यामुळे रुग्णालये फुल्ल झाल्याने उपचारांबाबत हेळसांड होत असल्याची भावना तयार झाली आहे. त्यामुळे रुग्ण दगावल्यास रुग्णलयांच तोडफोड, डॅाक्टरांच शी होणारे वाद व हल्ले वाढले आहेत. त्यामुळे आता पोलिस अलर्ट झाले आहेत. रुग्णाचा मृत्यू झाल्यास पोलिसांना लिखीत सूचना देण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.  

रुग्णांच्या नातेवाइकांकडून थेट हॉस्पिटल आणि डॉक्टरवर हल्ले सुरू झाले आहेत. हल्ले टाळण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नियमावली जाहीर केली असून, यापुढे कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधित हॉस्पिटलने ती माहिती लेखी स्वरूपात जवळच्या पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाला किंवा प्रकृती खालावल्यास त्यांचे नातेवाईक व इतर समाजकंटकांकडून डॉक्टरवर हल्ले होतात. याप्रकरणी हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन नाशिकने संरक्षणाची मागणी केल्याने डॉक्टर व रुग्णालयावर होणारे हल्ले रोखण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींची पोलिस आयुक्तालयात बैठक झाली. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी कोरोना मृत्यू झाल्यास रुग्णालयांनी त्या त्या भागातील पोलिस ठाण्यात माहिती कळविण्याचे आदेश काढले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीयव्यवस्था यंत्रणा कोलमडली आहे. रुग्णांना उपचार मिळणे सहज शक्य होत नसल्याने रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले. मात्र, यामुळे थेट हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्सवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले. शहरात कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने लागलीच ही माहिती जवळच्या पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना कळवयाची आहे. पोलिस निरीक्षकाने चौकशी करून हल्ला होण्याची शक्यता असल्यास लागलीच पुढील कार्यवाही करायची आहे. यामुळे हॉस्पिटल आणि पोलिस निरीक्षकांचे काम वाढणार असले तरी हल्ल्यासारख्या धक्कादायक घटना रोखण्यात यश मिळू शकते. हद्दीतील विविध समाजाची, नागरिकांची, त्यांच्याकडून होणाऱ्या संभाव्य घटनांची कल्पना पोलिस निरीक्षकांना येऊ शकते आणि पुढील घटनांना पायबंद घालता येऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जाते आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT