Avinash Jadhav .jpg
Avinash Jadhav .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

मलंगगडावर पोचण्याआधीच पोलिसांनी अविनाश जाधवांना केली अटक

सरकारनामा ब्यूरो

उल्हासनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना अटक करण्यात आली आहे. जमावबंदी आदेश लागू असताना गर्दी केल्याचा ठपका जाधव यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अविनाश जाधव यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

अविनाश जाधव हे मलंगगडावर आरती करण्यासाठी जाणार होते. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी त्यांना काकडवाल गावाजवळ अडवले. तेथून त्यांना नेवाळी पोलिस चौकीत आणले. यावेळी जाधव यांच्यासोबत मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

उल्हासनगर परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते, अंबरनाथचे सहाय्यक पोलिस आयुक्त विनायक नरळे यांनी जाधव यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर जाधव यांना नेवाळी पोलिस ठाण्यातून उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात नेण्यात आले. हिललाईन पोलिसांनी जाधव यांना अटक केली.

या अटके नंतर जाधव यांनी ट्वीट केले आहेत. ते म्हणाले, ''काल मलंगगडावर पौर्णिमा महाआरतीसाठी धर्मांध मुस्लिम लोकांकडून विरोध करण्यात आला. आज मलंगगडावर जात असतांना पोलिसांनी मला अटक केली. सरकार दंगलखोरांवर काय कारवाई करणार? हेच तुमचं हिंदुत्व का?'' असा सवाल त्यांनी केला आहे. ''आता २७ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेला मलंगगडावर महाआरती करणार'', असेही जाधव यांनी सांगितले.

Edited By - Amol Jaybhaye  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT