nk21.jpg
nk21.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

मुख्यमंत्र्यांचा जनता दरबार लवकरच भरणार....

सरकारनामा ब्युरो

पाटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा जनता दरबारात जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सज्ज झाले आहेत. सचिवालय परिसरात हा जनता दरबार भरविण्यात येणार आहेत. प्रत्येक सोमवारी या जनता दरबाराचे आयोजन नितीश कुमार करणार आहेत, याबाबतची घोषणा त्यांनी केली आहे.   

पत्रकारांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले की, सर्वसामान्य जनतेसाठी कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर लवकरच जनता दरबाराचे आयोजन करण्यात येईल. दोन महिन्यात सामान्य जनतेला कोरोना लसीकरणानंतर साधारणः एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये जनता दरबार सुरू होईल.    
 
प्रत्येक सोमवारी विविध विभागाच्या समस्या सोडविण्यासाठी त्या विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या जनता दरबारात राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या व्यक्तीला सहभागी होण्याची संधी मिळत असते. 
यापूर्वी हा जनता दरबार मुख्यमंत्री निवासस्थान परिसरात होत होता. पण तो आता सचिवालय परिसरात होणार आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातर्फे या जनता दरबाराची तयारी सुरू करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने या जनता दरबारात नागरिक उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांच्यासाठी मोठे शेड उभारण्यात येत आहे. यात मंत्रालयातील विविध विभागाचे मंत्री, अधिकाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेची तयारी प्रशासनातर्फे सुरू आहे. नागरिकांसाठी अन्य सुविधा याठिकाणी केल्या जात आहेत. 

हेही वाचा : ममता बॅनर्जींच्या भाच्याची सीबीआय करणार चैाकशी..

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजा अभिषेक बॅनर्जी यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने आज समन्स बजावली आहे. कोळसा गैरव्यवहार प्रकरणात अभिषेक बँनर्जी यांना सीबीआयने हे समन्स बजावले आहे. त्यांची चैाकशी लवकर होणार आहे. सीबीआयचे पथक अभिेषेक बॅनर्जी यांच्या घरी आज पोहचले होते. 
 
दोन दिवसापूर्वी सीबीआयने बंगालमध्ये 13 ठिकाणी छापे मारले आहेत. यात कोळसा गैरव्यवहार, अवैध उत्खनन, चोरी अशा प्रकरणात सहभागी असलेल्या जयदेव मंडल आणि याप्रकरणात अनेक दिवसापासून फरार असलेला कोळसा माफिया अनूप माजी उर्फे लाला यांच्या घरांचाही समाववेश आहे. 

कोलकाता, पुरुलिया, पश्चिम बर्धमान, बांकुड़ा आदी परिसरात सीबीआयचे धाडसत्र सुरू आहे. सीबीआयने मंडल, माजी, अमिया स्टील कंपनीच्या परिसरात छापा मारून पाहणी केली आहे. यापूर्वी सीबीआयने काही दिवसापूर्वी कोळसा गैरव्यवहार प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे युवा नेता विनय मिश्रा, व्यावसायिक अमित सिंह, नीरज सिंह आदींच्या घरावर छापेमारी केली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT