Sarkarnama Banner - 2021-06-01T111957.311.jpg
Sarkarnama Banner - 2021-06-01T111957.311.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणाऱ्या भाजप आमदार भातखळकरांच्याविरोधात गुन्हा..

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबईतील मेट्रोच्या 2 ए आणि 7 या दोन मार्गिकांचे सोमवारी उद्घाटन झाले. यावेळी  कांदिवलीच्या आकुर्ली मेट्रो स्थानकाजवळ भाजपच्या  कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून या कार्यक्रमांचा निषेध केला. याप्रकरणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्यासमवेत भाजपच्या कार्यक्रर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.politics bjp mla atul bhatkhalkar booked for protest

समतानगर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून आमदार अतुल भातकळकर यांचं नाव आरोपींमध्ये दाखवण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.  आमदार अतुल भातखळकर यांचं नाव आरोपींमध्ये दाखवण्यात आलं आहे.

कांदिवलीच्या आकुर्ली मेट्रो स्थानकाचे उद्घाटन काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले होते. या प्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर समतानगर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाविकास आघाडीचे मंत्री बाळासाहेब थोरात, असलम शेख, नवाब मलिक आदित्य ठाकरे,  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते.  

हेही वाचा :  रायगडाकडे कूच करा..संभाजीराजेंचा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आदेश.. 

मुंबई : मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आरक्षणाच रद्द झाले आहे. त्याबाबत संभाजीराजे यांनी राज्यातील अनेक नेत्यांशी भेट घेत सर्वसहमती घडविण्याचा प्रयत्न केला. यात पुढे काय करता येईल, यासाठीचे काही मुद्दे त्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत मांडले. राज्यभिषेक दिनाला आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार असल्याचे सांगितले.   

या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी संभाजीराजेंनी काल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ऑनलाईन बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता ता 6 जून रोजी किल्ले रायगडावरून संभाजीराजे कोणती नवी घोषणा करणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT