sm24.jpg
sm24.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

सुभाषचंद्र बोस यांची हत्या काँग्रेसनेच घडवली..भाजप खासदाराचा आरोप

वृत्तसंस्था

लखनऊ:  नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवानला जाताना विमान दुर्घटनेत झाला. मात्र, त्यांच्या मृत्यूवरून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येतात. केंद्र सरकारने 2017मध्ये आरटीआयच्या माहिती अधिकाऱ्यातून दिलेल्या माहितीनुसार सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान दुर्घटनेत झाला आहे. पण सुभाषचंद्र बोस यांची हत्या काँग्रेसने केली असा गंभीर आरोप भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केला आहे. साक्षी महाराजांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. 

एका जाहीर सभेत साक्षी महाराज यांनी हा गंभीर आरोप केला आहे. या सभेत साक्षी महाराज म्हणाले की हे. काँग्रेसने सुभाषचंद्र बोस यांना मृत्यूच्या दाढेत पाठवलं होतं. माझा आरोप आहे की, काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या लोकप्रियतेपुढे पंडित नेहरू आणि महात्मा गांधीही फिके पडत होते. म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली.

आपल्या भाषणात साक्षी महाराज म्हणाले की नेताजींचं हे बलिदान देश कधीच विसरू शकत नाही. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं. इतिहासाने त्यांचं शौर्य, धाडस आणि पराक्रम दाबून ठेवण्याचं काम केलं आहे. स्वातंत्र्य मागितलं आणि ब्रिटिशांनी ते दिलं इतकं सोपं नव्हतं. रक्त सांडवून आपण आपलं स्वातंत्र्य मिळवलं आहे. यासाठी नेताजी सुभाषबाबूंना 'तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुँगा'चा नारा द्यावा लागला. 

हेही वाचा : दिल्लीच्या शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत महाराष्ट्राचाही 'चित्ररथ'
 नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले ५७ दिवस दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या पंजाब, हरियाणा व इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांना प्रजासत्ताक दिनी (मंगळवारी) राजधानीतील बाह्य वळण रस्त्यावर ट्रॅक्‍टर रॅली काढण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अखेर परवानगी दिल्याची माहिती शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दर्शन पाल यांनी दिली. या वेळी कोणतीही अप्रिय घटना होणार नाही व रॅलीनंतर लगेचच आंदोलक शेतकरी पुन्हा सीमांवर परततील याबाबत शेतकरी संघटनांच्या नेत्यांकडून दिल्ली पोलिसांनी रीतसर हमी मागितल्याचेही समजते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT