sanjay raut28.jpg
sanjay raut28.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

'असे येडे बरळतच असतात..' कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना राऊतांचा टोला..

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नाचा अभ्यास करा, असा सल्ला दिला आहे. राऊतांनी या विषयावरून लक्ष्मण सावडे यांना फटकारले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी सवदी यांच्यावर टीका केली.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी 'बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे,' असं व्यक्तव्य केलं काल केलं होते. या वव्यक्तव्यावर राऊत म्हणाले की असे येडे बरळतच असतात, काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे सागंतिलं तेच योग्य आहे. हा केवळ कर्नाटकचा प्रश्न नाही. तर दोन राज्यांच्या सीमांचा प्रश्न आहे. त्यामुळे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे. 

संजय राऊत म्हणाले, "बेळगावमध्ये मराठीचं काय स्थान आहे? असे सवाल करतानाच कानडी लोकांना आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जायला सांगत नाही. आम्ही फक्त कर्नाटक व्याप्त भाग महाराष्ट्रात यावा असं सांगत आहोत. मुंबईतील कानडींवर आम्ही कोणतीही सक्ती केली नाही. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. त्यांच्या शाळाही इथे आम्ही चालवतो. त्यांच्या संस्थाही महाराष्ट्रात चालतता. तशी परिस्थिती बेळगावमध्ये आहे का? कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा महाराष्ट्रात यावं आणि इथल्या कानडी लोकांशी बोलावं." 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते 'महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कर्नाटक सरकारवर टीकास्त्र सोडले होते. बेळगाव सीमावादाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये असूनही कर्नाटक सरकारने बेळगावचे नामांतर केले. हा उर्मटपणा आहे. हे सरकार बदललेल्या नावाप्रमाणेच बेलगाम असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला होता. 

बेळगावच्या नामांतरावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण यांनी पलटवार केला आहे. कर्नाटकमध्ये राहणारे सर्वजण कन्नडिगाच आहेत. उगाचच वाद निर्माण करणे, चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT