Possibility of fuel price Increase
Possibility of fuel price Increase 
मुख्य बातम्या मोबाईल

अरे बापरे...! इंधन दरवाढीची शक्‍यता 

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : जगभरात लॉकडाउन शिथिल करण्यात येत असल्याने इंधनाच्या मागणीत वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही इंधनाच्या किंमती वधारल्या आहेत. त्याचा परिणाम देशातील इंधनाच्या किंमतीवर होण्याची शक्‍यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर 4 ते 5 रुपयांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे. येत्या आठवड्यात इंधन दरवाढ होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. 

सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि पेट्रोल विक्रेत्यांची नुकताच एक बैठक पार पडली. यात कोरोना आणि लॉकडाउनमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत येत्या जूनपासून तेलाच्या किमतीचा दैनंदिन आढावा घेण्याचे ठरविण्यात आले आहे. 

कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आले होते. त्यामुळे मागणी कमी झाल्याने लॉकडाउनच्या काळात इंधनाचा दैनंदीन आढावा तात्पुरता बंद करण्यात आला होता. मात्र, जूनपासून पेट्रोलियम कंपन्यांनी दररोजची दर निश्‍चिती पुन्हा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. 

महिनाभरात इंधनाच्या दरात 50 टक्के वाढ 

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये गेल्या महिनाभरात 50 टक्के वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरल 35 डॉलरवर पोचल्या आहेत. मात्र, पेट्रोलियम कंपन्यांनी देशातील पेट्रोल आणि डिझेल दर आतापर्यंत तरी स्थिर ठेवले आहेत. 

दरम्यान, इंधन दरात वाढ झाल्यास ग्राहकांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे. लॉकडाउनमुळे अगोदरचे सर्व व्यवहार थंड असताना आणि नागरिकांच्या खिशात पैशाची चणचण असताना इंधन दरवाढ झाल्यास नवी समस्या निर्माण होऊ शकते. या इंधन दरवाढीच्या शक्‍यतेमुळे वाहनचालकांना पुन्हा आपल्या बजेटची मांडणी करावी लागणार आहे. काटकसरीचे धोरण नागरिकांना आणखी तीव्र करावे लागण्याची चिन्हे आहेत. 

इंडियन ऑइलच्या दर पत्रकानुसार विविध शहरांतील गुरुवारचे पेट्रोल-डिझेलचे दर (प्रति लिटर रुपयांमध्ये) 

मुंबई 
►पेट्रोल : 76.31 
►डिझेल : 66.21 

नवी दिल्ली 
►पेट्रोल : 71.26 
►डिझेल : 69.39 

चेन्नई 
►पेट्रोल : 75.54 
►डिझेल : 68.28 

हैदराबाद 
►पेट्रोल : 73.97 
►डिझेल : 67.28 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT