मुख्य बातम्या मोबाईल

परदेशी शिष्यवृत्तीच्या निर्णयाला स्थगिती, संकट संपल्यानंतर निर्णय

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राजर्षी शाहू महाराज परदेशी विद्यापीठ शिष्यवृत्तीसंदर्भात सरकारने 5 मे रोजी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

कोरोनाचे संकट संपल्यानंतर याबाबत सर्व समाजसंघटक, संघटना व सर्व संबंधितांशी चर्चा करून सर्वसमावेशक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

अनुसूचित जातींच्या मुला-मुलींसाठी परदेशी शिक्षणात संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा, यासाठी विविध विषयांमध्ये परदेशांमधील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्याची राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आहे. 

या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांचे सर्व मार्गांनी येणारे उत्पन्न हे सहा लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावरून अनुसूचित जातीच्या विद्यार्थी व पालक वर्गांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

याविरोधात काही संघटनांनी आंदोलन, निवेदने काढली होती. यासंदर्भात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी क्रीमिलेअरची अट टाकण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

मंगळवार (ता. 19) त्यांनी याबाबत ट्विट करत या निर्णयाला स्थगिती देण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच कोरोनाचे संकट संपल्यानंतर याबाबत सर्व समाजघटक, संघटना व सर्व संबंधितांशी चर्चा करून सर्वसमावेशक निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही मुंडे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT