30Sarkarnama_20Banner_20_202021_05_02T160320.969.jpg
30Sarkarnama_20Banner_20_202021_05_02T160320.969.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची आयपँक टीम नजरकैदेत

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये तृणमूल काँग्रेसच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या टीमचा त्रिपुरा पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. प्रशांत किशोर यांच्या आयपँक कंपनीचे २० ते २२ कर्मचारी हे आगरतळा येथील एका हाँटेलमध्ये उतरले आहेत. तेथे त्यांना नजरकैदेत ठेवलं आहे. 

त्रिपुरामध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांची टीम  तृणमूल काँग्रेससाठी राजकीय आढावा घेत आहे. तर दुसरीकडे आगरतळा पोलिसांनी सांगितलं की, या सर्वांची कोरोना टेस्ट केली असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. त्यांनी यापूर्वी आरटीपीसीआर अहवाल हाँटेल व्यवस्थापनाला दिलेला नाही. आम्ही रि्पोर्टची वाट पाहत आहोत. 

या घटनेचा तृणमूल काँग्रेसचे त्रिपुरा अध्यक्ष आशिष सिंह यांनी निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, आयप्ँकची टीम या ठिकाणी आढावा घेण्यासाठी आली आहे. त्यांना असे नजरकैद करणे चुकीचे आहे. हा लोकशाहीवरील हल्ला आहे. त्यांचा सव्हेक्षणाला राज्य सरकार घाबरत असल्याने त्यांनी त्यांना नजरकैदेत ठेवलं आहे. 

इंग्लंड कोर्टाचा विजय मल्ल्याला दणका ; दिवाळखोर घोषीत
नवी दिल्ली :  हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडविणारा उद्योगपती विजय मल्ल्याला Vijay Mallya लंडनच्या Court of Englandउच्च न्यायालयाने झटका दिला आहे. न्यायालयाने मल्ल्याला दिवाळखोर म्हणून घोषित केले आहे. या निकालामुळे मल्ल्याची भारतातील संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT