Pravin Darekar
Pravin Darekar  
मुख्य बातम्या मोबाईल

सचिन वाझे लादेन नाही, संशयित आरोपी असल्याचे तरी मान्य करा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानासमोर स्फोटकांनी सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी रात्री अटक केली आहे. तत्पूर्वी सुमारे 10 तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी करण्यात आली. वाझे प्रकरणावर बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काही दावे केले आहेत. 

सचिन वाझे यांना निलंबित करून त्यांना अटक करावी, अशी मागणी सर्वात आधी भाजपने केली, असा दावा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना रविवारी केला. राज्य सरकारला जर दस्तावेज मिळत नसतील, तर ते त्यांचे अपयश आहे. सर्व यंत्रणा असताना देखील जर पुरावे मिळत नसतील तर ते राज्य सरकारचे आतापर्यंतचे सर्वात मोठे अपयश आहे, असे दरेकर यांनी नमूद केले.   

दरेकर म्हणाले,  मानसुख हिरेन यांच्या पत्नीने हत्येचा आरोप केला असल्यामुळे वाझेंना निलंबित करून अटक करावी, अशी आमची मागणी होती. आता कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर चौकशी  करून त्यांना अटक झाली आहे. आता प्रश्‍न उभा राहतो तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या "ओसामा बिन लादेन सारखे वाझेंकडे पाहिले जात आहे" या वक्तव्याबाबत. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे की आम्ही म्हणत नाही ते ओसामा बिन लादेन आहेत, पण ते संशयित आरोपी आहेत, एवढं तरी तुम्ही मान्य कराल की नाही ?

आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाझेंवर निलंबनाची कारवाई करून, सरकार त्यांना पाठीशी घालत नाही, हे  दाखवण्याची संधी आहे, ती संधी ते साधतील का ? असा टोलाही दरेकर यांनी लगावला. दरेकर पुढे बोलताना म्हणाले, विरोधी पक्षाकडे पुरावे येतात त्यावेळी जनतेच्या मनात सरकारची विश्वासाहर्ता कमी होते.  हे सरकारचं अपयश आहे की, त्यांना दस्तावेज मिळत नाहीत,  तुमच्याकडे यंत्रणा असून तुम्ही काही करत नाही. त्यामुळे जनता विरोधी पक्षाकडे पुरावे देतात. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT