Pregnant Doctor share video message before death
Pregnant Doctor share video message before death 
मुख्य बातम्या मोबाईल

कोरोनाला हलक्यात घेऊ नका! गर्भवती डॅाक्टरने मृत्युपूर्वी दिला इशारा...व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाचा कहर वाढत चाललेला असतानाही अनेकजण अनेकांना अजूनही गांभीर्य नाही. मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे WHO च्या शास्त्रज्ञांनीही सांगितले आहे. एका गर्भवती डॅाक्टरनेही मृत्युपूर्वी एका व्हिडिओद्वारे देशावासिकांना 'कोरोनाला हलक्यात घेऊ नका,' असे आवाहन केले आहे. (Pregnant Doctor share video message before death)

दंतचिकित्सक डॅा. डिंपल अरोला चावला यांचा कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्यावेळी त्या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांना ११ एप्रिल रोजी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर २६ एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. हा व्हिडिओ त्यांनी १७ एप्रिल रोजी केला आहे. त्यांचे पती रविश यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

व्हिडिओमध्ये डॅा. डिंपल म्हणतात, कृपया कोरोनाला हलक्यात घेऊ नका. खूप गंभीर लक्षणं आहेत. मला बोलताही येत नाही. पण माझा संदेश सर्वांपर्यंत पोहचावा असे वाटते. तुम्ही जेव्हा बाहेर जाल, लोकांशी घरात किंवा बाहेर बोलत असाल तेव्हा कृपया मास्कचा वापर करा. आपल्या जवळच्या लोकांच्या सुरक्षेसाठी.'

रविश चावला यांनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यावर अनेकांनी आपल्या भावनाही व्यक्त केला आहेत. रविश म्हणाले, माझ्या पत्नीच्या शेवटच्या इच्छेचा सन्मान म्हणून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. लोकांनी या महामारीकडे दुलर्क्ष करू नये, हा उद्देश आहे. कोरोना पॅाझिटिव्ह आल्यानंतर १० दिवसांनी त्यांची अॅाक्सीजन पातळी कमी होऊ लागली. त्यामुळं लगेच रुग्णालयात नेलं. तिथे रेमडेसिविर, प्लाझ्मा थेरपी दिली. त्यांना २५ तारखेला प्रसुती वेदना होऊ लागल्या. तपासणी केल्यानंतर पोटातच बाळाचा मृत्यू झाल्याचे आढळले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिचाही मृत्यू झाला, असे रविश यांनी सांगितले. 

मृत्यूचे तांडव सुरूच 

देशामध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत नाही. बुधवारी २४ तासांत पुन्हा ४ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण मृतांचा आकडा २ लाख ५८ हजार ३१७ वर पोहचला आहे. तर नव्याने ३ लाख ६२ हजार ७२७ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांचा आकडा २ कोटी ३७ लाख ३ हजार ६६५ पर्यंत वाढला आहे. बुधवारपर्यंत देशात ३७ लाख १० हजार ५२५ सक्रीय रुग्ण होते. एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण १५.६५ टक्के एवढे आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT