Suraj Mandhare
Suraj Mandhare 
मुख्य बातम्या मोबाईल

कोरोना नसतांनाही खासगी लॅबकडून पॉझिटिव्ह अहवाल !

सरकारनामा ब्युरो

नाशिक : जिल्ह्यात सरकारी लॅब आणि खासगी लॅबमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण विसंगत आहे. काही खासगी लॅबकडून कोरोना नसतांनाही पॉझिटिव्ह अहवाल दिले गेल्याचे महापालिकेच्या चौकशीत पुढे आले आहे. महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दिला आहे. चुकीचे, अवास्तव अहवाल देणाऱ्या खासगी प्रयोगशाळांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यार्तंगत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल हा काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला होता. खासगी व सरकारी प्रयोगशाळांच्या अहवालात पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण विसंगत आहे. त्याविषयी चौकशी करण्याच्या पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोरोना आढावा बैठकीत या अहवालाच्या सत्यतेच्या चौकशीच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही दिवसांपासून चौकशी सुरु होती नाशिक महापालिकेने कोरोना पॉझिटिव्ह अहवालाविषयी चौकशीचा अहवाल जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना सादर केला असून त्यात, ही विसंगती पुढे आल्याचे समजते.

२५ टक्केचा फरक
खासगी लॅबमध्ये कोरोना पॉझिटिव्ह सापडण्याचे प्रमाण ३० टक्के असतांना सरकारी लॅबमध्ये मात्र हेच प्रमाण ४.५ ते ५ टक्के इतकेच आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण सापडण्याच्या प्रमाणात खासगी व सरकारी लॅबमध्ये अहवालाची विसगंती जवळपास २५ टक्के आहे. या तक्रारीला पृष्टी देणारे अहवाल असल्याचे पुढे आले आहे.

गुन्हे दाखल करणार
महापालिकेचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र जिल्हा रुग्णालयातकडून अद्याप अहवाल यायचा आहे. दुसरा अहवाल प्राप्त होण्याची प्रतिक्षा आहे. अहवाल आल्यानंतर त्यात देखील विसंगती आल्यास सदोष अहवालाबाबत आपत्ती व्यवस्थापन कायद्यार्तंगत आणि फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. - सूरज मांढरे,  जिल्हाधिकारी.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT