Push to Harshvardhan Patil in Indapur: NCP's decisive lead in winning Nimgaon Gram Panchayat
Push to Harshvardhan Patil in Indapur: NCP's decisive lead in winning Nimgaon Gram Panchayat  
मुख्य बातम्या मोबाईल

इंदापुरात हर्षवर्धन पाटलांना धक्का : निमगाव ग्रामपंचायत जिंकत राष्ट्रवादीची निर्णायक आघाडी 

डॉ. संदेश शहा

इंदापूर  ः राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालात राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिल्या फेरीत जोरदार मुसंडी मारली आहे. निमगाव केतकी ग्रामपंचायतीत दहा वर्षानंर परिर्वतन झाले असून भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाकडे असलेली ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे आली आहे. येथील ९ जागा राष्ट्रवादीने, तर पा जागा भाजपने जिंकल्या आहेत.

पहिल्या फेरीत काटी, तरंगवाडी, शहा यांसह ३७ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने निर्णायक आघाडी घेतली आहे. निकालाचा कल असाच कायम राहिला तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जाईल. 

इंदापूर तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या निमगाव केतकी ग्रामपंचायतीत दहा वर्षांनंतर परिवर्तन झाले आहे. पाटील गटाकडे असलेली ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या १७ पैकी १४ जागांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातील ९ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत, तर पाच भाजपच्या वाट्याला गेल्या आहेत. ही ग्रामपंचायत पूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या गटाकडे होती. 

काटी ग्रामपंचायत ही पूर्वी हर्षवर्धन पाटील गटाकडे म्हणजेच कॉंग्रेसकडे होती. या वेळी ही ग्रामपंचायत कॉंग्रेसकडून राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ग्रामपंचायतीच्या १३ जागांपैकी सात जागा जाहीर झाल्या आहेत. यातील ५ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत, तर २ जागा भाजपने जिंकल्या आहेत. या ठिकाणी परिवर्तन अटळ आहे.

तरंगवाडी ग्रामपंचायतीच्या ९ जागांपैकी ९ ही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. शहा ग्रामपंचायतीमध्ये काट्याची टक्कर आहे. येथील ५ जागा राष्ट्रवादीकडे, ४ भाजप जागा राष्ट्रवादीकडे गेल्या आहेत. गोतोंडीमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीने पाच जागा जिंकत आघाडी घेतली असली तरी भाजप आणि अपक्षांनी या ठिकाणी राष्ट्रवादीला कडवी लढत दिली आहे. या ठिकाणी भाजप आणि अपक्षांनी प्रत्येकी चार जागा जिंकल्या आहेत. गोतोंडी ग्रामपंचायतीच्या सत्तेची चावी अपक्षांच्या असणार आहे.

भोरमधील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीचा पहिला निकाल चिठ्ठीवर


खेड-शिवापूर (जि. पुणे)  ः भोर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वेळू ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक एकमधील निकालही मोठा चुरशीचा ठरला. वार्ड क्रमांक एकमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील अवंती तनपुरे आणि सारीका जाधव या उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिट्ठी काढून निकाल देण्यात आला. त्यात सारीका जाधव यांच्या नावाची चिट्ठी निघाल्याने ग्रामपंचायत सदस्यपदाची माळ जाधव यांच्या गळयात पडली.

वेळू ग्रामपंचायत भोर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक एकमधील जागांची मतमोजणी सकाळी लवकर झाली. या वार्डात सर्वसाधारण पुरुष आणि सर्वसाधारण महिला या जागेवर श्री भैरवनाथ परीवर्तन पॅनेलचे अप्पा तानाजी धनावडे आणि संगीता दत्तात्रेय पांगारे हे उमेदवार विजयी झाले. तर याच वार्डात नागरिकांचा मागास वर्ग या जागेसाठी श्री भैरवनाथ परिवर्तन पॅनेलच्या अवंती तनपुरे आणि भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या सारीका जाधव यांच्यात लढत होती. मतमोजणीत तनपुरे आणि जाधव यांना प्रत्येकी 244 अशी सारखी मते पडली. त्यामुळे या जागेचा निकाल चिट्ठी काढून लावण्यात आला. त्यात भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या सारीका जाधव यांच्या नावाची चिट्ठी निघाली. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यपदाची माळ जाधव यांच्या गळ्यात पडली.

दरम्यान, दिवळे गावातील उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठी टाकून विजय उमेदवार निवडण्यात आला. या मध्ये दिवळे गावातून निलेश पांगारे हे निवडून आले आहेत.

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT