ajit pawar -rahul kul
ajit pawar -rahul kul 
मुख्य बातम्या मोबाईल

अजितदादांच्या स्वागताला मंत्रालायत चक्क आमदार राहुल कुल!

तुषार रूपनवर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले अजित पवार आज पहिल्यांदाच मंत्रालयात दाखल झाले. तेथे त्यांच्या स्वागतसाठी चक्क भाजपचे आमदार राहुल कुल हे उपस्थित होते.

फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या पदाचा कार्यभार आज स्वीकारला. त्यांनी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. साऱ्यांचे लक्ष आज सत्तापेचावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे होते. मात्र दोन्ही नेत्यांनी कार्यभार स्वीकारून आपण याबाबत निवांत असल्याचे दाखवून दिले.

भाजपा आमदार राहूल कुल अजित पवार यांच्या स्वागतासाठी मंत्रालयाच्या दालनात उभे. राहूल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत काम केलं

राहुल कुल हे पाच वर्षांपूर्वी पवार यांचे कट्टर समर्थक होते. मात्र राष्ट्रवादीच्या विरोधात लढून ते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर पाठीराखे बनले. एवढेच नव्हे तर पवार कुटुंबीयांना लोकसभा निवडणुकीत आव्हान देत थेट सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपल्या पत्नी कांचन कुल यांना रिंगणात उतरविले. तेच राहुल कुल हे अजितदादांच्या स्वागतासाठी उपस्थित झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृ्त्त्वाखाली महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल आणि विकासाचा वेग वाढेल, अशी प्रतिक्रिया राहुल यांनी यानंतर व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT