Raj Thakrey
Raj Thakrey 
मुख्य बातम्या मोबाईल

राज ठाकरे म्हणाले, मी येतोय, पण गर्दी करु नका !

संपत देवगिरे

नाशिक : कोरोनामुळे राजकीय नेत्यांचे दौरे, कार्यक्रमांवर देखील परिणाम झाला आहे. प्रदिर्घ काळानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकचा दौरा करणार आहेत. यावेळी भेटायला गेलेल्या पदाधिका-यांना ते म्हणाले, `मी येतोय. पण गर्दी करु नका`

राज ठाकरे यांचा हा खाजगी दौरा आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे मामा नित्तरंजन धैर्यशीलराव पवार यांच्या मुलाचा 5 मार्चला विवाह समारंभ आहे. या विवाह सोहळ्यानिमित्त राज ठाकरे ४ मार्चला नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. मात्र नाशिकला कोरोना वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने विविध बंधने टाकली आहेत. रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, नाशिकचे शहराध्यक्ष अंकुश पवार, मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शाम गोहाड यांनी मुंबईत कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे त्यांना ही माहिती दिली. 

राज ठाकरे यांचा दौरा असल्याने आणि तो देखील अनेक दिवसांनी होत असल्याने कार्यकर्ते स्वागतासाठी गर्दी करणारच. कार्यक्रमांचेही आयोजन होऊ शकते. अनेकदा या उत्साहात कार्यकर्ते कोरोना संदर्भात घ्यावयाची काळजी, बंधनेही पाळत नसतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिका-यांना मी येणार आहे, मात्र कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात ठेवा. कोणीही गर्दी करु नये अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या. 

नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी नाशिकचा दौरा करावा यासाठी स्थानिक नेते, पदाधिकारी प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी कार्यक्रम देखील निश्चित केले आहेत. हे पदाधिकारी स्वतः मुंबईत जाऊन आले होते. शहरात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॅाग्रेस आदी पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामुळे मनसेलाही वातावरण निर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत.
....


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT