मुख्य बातम्या मोबाईल

रजनीकांत म्हणतात, राजकारणाबाबत लवकरच मोठी घोषणा करणार ! 

वृत्तसंस्था

चेन्नई : पुढील वर्षी तमिळनाडूत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच वातावरण तापू लागले आहे. तेथील ज्येष्ठ अभिनेते आणि तमिळी जनतेचा सुपरस्टार रजनीकांत लवकरच मोठी घोषणा करण्याची शक्‍यता आहे. तसे ट्‌विट त्यांनी केले आहे. 

तमिळनाडूत दिवंगत नेत्या आणि माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या अ. भा. अण्णा द्रमुक पक्षाची एक हाती सत्ता आहे. तर विरोधी बाकावर द्रमुक आहे. हे दोन्ही पक्ष आलटूनपालटून सत्तेवर येत राहिले आहेत. जयललिता आणि करूणानिधी हे या राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र यावेळच्या निवडणुकीत हे दोन्ही नेते नाहीत. त्यांने निधन झाले आहे. द्रमुकचे सर्वेसर्वा म्हणून करूनानिधी यांचे पुत्र स्टॅलिन पुढे आले आहे. 

राज्यात द्रमुकने चांगली वातावरण निर्मिती केली आहे. जयललिता नसल्याने त्यांच्या पक्षाला किती यश मिळेल हे सांगता येत नाही. भाजपही येथे पाय रोवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र कोणाशी आघाडी करायची हे ठरलेले नाही. जर रंजनीकांत पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरले तर राजकीय समीकरणे बदलतील का याचीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असनाता रजनीकांत यांनी आज आपल्या समर्थकांशी संवाद साधला आहे. 

मक्कल मंद्रम हा रजनीकांत यांचा पक्ष आहे. या पक्षाच्या राज्यातील जिल्हा अध्यक्षांबरोबर रजनीकांत यांनी राघवेंद्र हॉल येथे बैठक आयोजित केली होती. यावेळी त्यांनी आगामी विधानसभेसाठी चर्चा केली. या बैठकीनंतर रजनीकांत यांनी ट्‌विट केले आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात,"" आजच्या बैठकीत जिल्हा सचिवांशी चर्चा केली असून त्यांची मते जाणून घेतली आहेत. त्यांनी मला भक्कम पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे. लवकरात लवकर निर्णय घेणार आहे. 

रजनीकांत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढे येण्याची चिन्हे आहेत. त्यांचा पक्ष राजकीय मैदानात उतरल्यास ते अण्णाद्रमुक आणि द्रमुक पक्षाशी कसा लढा देतात हे पाहावे लागणार आहे. भाजप रजनीकांत यांच्याशी हात मिळवणी करणार का ? याचीही चर्चा सुरू आहे. तसेच जयललिता यांची मैत्रीण शशिकला नटराजन यांचीही नुकतीच तुरूंगातून सुटका झाली आहे. रजनीकांत कोणती घोषणा करतात याकडे देशातील सर्वच पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT