Ram Mandir trust denies land scam in ayodhya
Ram Mandir trust denies land scam in ayodhya 
मुख्य बातम्या मोबाईल

राम मंदिर जमीन गैरव्यवहाराने 'दिल्लीश्वरां'च्या पायाखालची वाळू सरकली

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या (Ram Mandir) जमीन खरेदीतील कथित गैरव्यवहारावरून (Land Scam) देशभरातील राजकारण तापलं आहे. जमीन खरेदीत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा खुलासा राम मंदिर ट्रस्टने केला आहे. या आरोपांची केंद्र सरकारनेही दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवण्यात आल्याचे समजते. (Ram Mandir trust denies land scam in ayodhya)

राम मंदिर जमीन खरेदीवरच आरोप लावण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे आणि आपचे खासदार संजय सिंग यांनी पत्रकार परिषदेत जमीन व्यवहाराची कागदपत्रे सादर करत भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झआले आहे. ट्रस्टने आज यावर स्पष्टीकरण देत जमीन खरेदीमध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे. 

पुढील वर्षी उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुका होत आहेत. या मुद्दावरून विरोधकांकडून भाजपला लक्ष्य केले जाऊ शकते. निवडणुकीत ही बाब अडचणीची ठरू शकते. त्यामुळं भाजपकडून आता यामध्ये लक्ष्य घालण्यात येत आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून याची गांभीर्याने दखल घेण्यात आल्याचे समजते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविल्याचे समजते. मंदिर ट्स्टने देखील केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक सविस्तर पत्र पाठवून गैरव्यवहार झाला नसल्याचा दावा केला आहे. 

काय केलेत आरोप?

पांडे म्हणाले, राम जन्मभूमीच्या जमिनीलगत असलेली एक जमीन पुजारी हरीश पाठक आणि त्यांच्या पत्नीने 18 मार्च रोजी सुल्तान अंसारी आणि रवि मोहन यांना दोन कोटी रुपयांना विकली होती. त्यानंतर काही मिनिटांतच चंपत राय यांनी ट्रस्ट मार्फत हीच जमीन 18.5 कोटी रुपयांना खरेदी केली. या जमिनीत असे काय होते की, दहा मिनिटांतच त्याला सोन्याचा भाव आला, असे आरोप पांडे यांनी केले आहेत. 

पांडे यांच्या आरोपांनंतर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनीही लखनऊ मध्ये पत्रकार परिषदेत हे आरोप केले. पाच मिनिटांमध्ये या जमिनीचे भाव 16.5 कोटींनी वाढले. हा जागतिक विक्रम आहे. रविमोहन तिवारी आणि सुल्तान अंसारी यांच्याकडून 18.5 कोटी रुपयांना खरेदी केलेल्या जमीने भाव प्रति सेकंदाला साडे पाच लाखांनी वाढले. जगात कुठेच एका सेकंदात जमिनीचे भाव एवढे वाढले नाहीत, असे संजय सिंह म्हणाले. या जमीन व्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सिंह यांनी केली आहे. 

मंदिर ट्रस्टचे म्हणणे...

ट्रस्टने खरेदी केलेली जमीन मोक्याच्या ठिकाणी असल्याने या जमिनीची किंमत अधिक आहे. या जमिनीच्या खरेदीबाबत दहा वर्षांपासून चर्चा सुरू होती. या व्यवहारामध्ये नऊ लोकं होती. इतर भागातील जमिनीपेक्षा ही जमीन तुलनेनं स्वस्त आहे. व्यवहार झाल्यानंतर रक्कम थेट बँक खात्यात जमा केल्याचा दावाही ट्रस्टने केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT