Rane supporter BJP's Sawantwadi Panchayat Samiti member Shrikrishna Sawant will resign
Rane supporter BJP's Sawantwadi Panchayat Samiti member Shrikrishna Sawant will resign 
मुख्य बातम्या मोबाईल

राणे समर्थक भाजपचे पंचायत समिती सदस्य राजीनामा देणार

सरकारनामा ब्यूरो

सावंतवाडी  ः सावंतवाडी येथील पंचायत समितीचे भारतीय जनता पक्षाचे सदस्य श्रीकृष्ण ऊर्फ बाबू सावंत हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या पवित्र्यात आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेऊन पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा देणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

वैयक्तीक कारणामुळे मी राजीनामा देत आहे, असे पंचायत समिती सदस्य सावंत यांचे म्हणणे आहे. आपला पक्षावर किंवा पक्षाच्या नेत्यावर कुठलाही राग नाही, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र, भारतीय जनता पक्षासाठी तळमळीने काम करणाऱ्या सावंत यांनी पदाचा राजीनामा देण्यापर्यंत घेतलेल्या भूमिकेमुळे नक्कीच काहीतरी राजकीय कारण असल्याचे बोलले जात आहे.

पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत यांनी शनिवारी (ता. १० एप्रिल) याबाबत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘मी गेली अनेक वर्षे कट्टर राणे समर्थक म्हणून काम केले आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. मात्र, विकास कामांना न मिळणारा निधी, तसेच घरगुती कारणामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याठिकाणी अन्य कोणाला तरी संधी मिळावी, अशी माझी अपेक्षा आहे. राजीनामा दिला असला तरी मतदार संघात कार्यरत राहणार आहे. पक्षासाठी व पक्ष नेतृत्वासाठीसुद्धा भविष्यात माझी काम करण्याची तयारी आहे.’’

सावंत हे गेली चार वर्षे पंचायत समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. आगामी काळात होणाऱ्या पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी ते प्रबळ दावेदार होते. नेत्याकडूनही त्यांना शब्द देण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी अचानक अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क काढले जाणार आहेत.

हेही वाचा : लॉकडाउनसंदर्भात संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय होणार 

बारामती : ‘‘पुण्यात आज दुपारी एक मिटिंग होत आहे, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसह सर्वपक्षीय नेत्यांची एकत्र बैठक मुंबईत बोलावली आहे. त्याला राज्याचे विरोधी पक्षनेतेही उपस्थित राहणार आहेत. त्या बैठकीत लॉकडाउनसंदर्भात जो निर्णय घेण्यात येईल, तो संपूर्ण राज्यासाठी असेल. तो निर्णय आज संध्याकाळी किंवा उद्या जाहीर करण्यात येईल,’’ असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलताना सांगितले. 

बारामतीतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या आणि उपाय योजना याबाबतचा आढावा अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. 

बारामतीत एक, पुण्यात एक आणि राज्याचा वेगळा असे तीन तीन निर्णय घेऊन चालणार नाही. पण, बारामतीत सोयी सुविधांचा आढावा घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना आणि आदेश देण्यासाठी ही बैठक बोलविण्यात आली होती. बेड, रुग्णवाहिका याची उपलब्धता याचाही आढावा घेतला. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून प्रशासनाने जे निर्बंध घातलेले आहेत, त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याबाबतची सूचना अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना दिल्याचे पवार यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT