मुख्य बातम्या मोबाईल

सोलापूर रेल्वे मंडळ समितीच्या अध्यक्षपदी निंबाळकर

सरकारनामा ब्युरो

सातारा : पुणे येथे झालेल्या बैठकीत माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सोलापूर रेल्वे मंडळ समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

या बैठकीस खासदार सिद्धेश्वर महाराज, खासदार गिरीश बापट, उमेश जाधव, श्री. साबळे,  श्रीरंग बारणे, धैर्यशील माने उपस्थित होते. 

या निवडीनंतर खासदार सिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते रणजितसिंह निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. सोलापूर रेल्वे मंडळ समितीच्या या मंडलाअंतर्गत सात जिल्हे येतात. पुणे, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT