Mla Rohit Pawar press conference news jalna
Mla Rohit Pawar press conference news jalna 
मुख्य बातम्या मोबाईल

रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटलांच्या विधानाला महत्व देण्याची गरज नाही...

उमेश वाघमारे

जालना ः भापज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे  दोन नेते गेल्या काही दिवसांपासून काहीही विधान करीत आहेत. राज्यातील आघाडी सरकार दोन महिन्यात पडणार काय आणि पवार कुटुंबातील अमुक एक व्यक्ती मुख्यमंत्री होणार ही या दोन नेत्यांची अलीकडे केलेली विधानं. पण तिकडे पाटील आणि इकडे दावने यांच्या विधानांना अधिक महत्व देण्याची गरज नसल्याचा टोला, राष्ट्रवादीचे आ्मदार रोहित पवार यांनी लगावला.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारा निमित्त आयोजित पदवीधर व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला रोहित पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी भाजप नेंत्यानी अलीकडच्या काळात केलेली विधान यावरून त्यांच्यावर चांगलीच टिका केली.

रोहित पवार म्हणाले, कोरोनाच्या काळात कधीही बाहेर न पडणारे नेते आता पदवीधर निवडणुकीसाठी बाहेर पडले आहेत. त्यांना आता दोन महिन्यात भाजपची सत्ता येणार असे वाटायला लागले आहे. परंतु रावसाहेब दानवे यांच्या त्या बोलण्याला अधीक महत्त्व देण्याची गरज नाही. तसेच पवार कुटुंबातील कोणता सदस्य मुख्यमंत्री होणार संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानालाही महत्व देण्याची गरज नाही.. 

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना राज्यात चांगला प्रतिाद मिळतो आहे. सरकारमधील तीनही पक्षांचे नेते, पदाधिकारी एकजुटीने काम करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे बहुतःशी उमेदावर निवडुण येतील, असा विश्वासही  पवार यांनी व्यक्त केला.

राज्यात नवीन उद्योग आणण्यासाठी सरकराने मागील नऊ ते दहा महिन्यात ५० ते ५२ कोटी रूपयांचे करार केले आहेत. जनतेने भाजप आणि महाविकास आघाडी सरकारच्या कामातील फरक पाहिला आहे. भाजपने कोरोनाच्या काळातही विरोधाला विरोध केला, असेही पवार म्हणाले. आमदार श्री. पवार म्हणाले. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT