मुख्य बातम्या मोबाईल

रश्‍मी ठाकरे : "मातोश्री'च्या स्टॅटेजिस्ट 

उमेश घोंगडे

पुणे : ठाकरे सरकार आणण्यात ज्यांची कामगिरी महत्वपूर्ण ठरली त्यात खासदार संजय राऊत, मिलींद नार्वेकर व शिवसेना पक्षप्रमुख व नियोजित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे यांच्या भूमिकेची चर्चा आता सुरू झाली आहे. 

आपण मुख्यमंत्री होऊ शकतो या कल्पनेची सुरवातच मुळी या तिघांच्या डोक्‍यातून आली. त्यास खासदार राऊत यांनी शरद पवार यांच्या माध्यमातून मोठी दिशा दिली. मात्र, उध्दव व ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत या साऱ्याच्या "स्ट्रॅटेजिस्ट' म्हणून रश्‍मी ठाकरे यांनी पडद्यामागून भूमिका बजावली. 

विधानसभा निवडणुकीआधीपासून भारतीय जनता पार्टीसोबत युती करण्यास खासदार राऊत यांचा विरोध होता. मात्र, त्यावेळी त्यांचा आवाज क्षीण होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती येईपर्यंत खासदार राऊत एका बाजूला होते.

मात्र, भाजपाशी काडीमोड घेऊन राष्ट्रवादीबरोबर जाण्याची त्यांची भूमिका कायम होती. निवडणुकीत भारतीय जनता पार्टी 105 वर अडकल्यानंतर राऊत यांनी आपले मिशन पुन्हा सुरू केले. मात्र,या साऱ्याच्या मागे मिलींद नार्वेकर व रश्‍मी ठाकरे या होत्या. 

रश्‍मी ठाकरे या खरे तर पडद्यामागून "स्ट्रॅटेजी' ठरवत होत्या. माध्यमांसमोर त्या कधीच आल्या नाहीत. रश्‍मी ठाकरे या मुळच्या दाभोळच्या. दाभोळ हे त्यांचे जन्मगाव. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण डोंबिवलीत झाल्यानंतर 13 डिसेंबर 1988 ला त्यांचा विवाह उध्दव यांच्याशी झाला.

ठाकरे यांचे उत्तराधिकारी ठरवण्याचा प्रश्‍न जेव्हा शिवसेनेत निर्माण झाला. त्यावेळीदेखील रश्‍मी यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता यांच्याशी जसे त्यांचे आपुलकीचे संबंध आहेत तसेच शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांशी तितकेच आपुलकीचे संबंध त्यांनी जपले आहेत. गझलांची विशेष आवड असणाऱ्या रश्‍मी यांना गुलाम अली व किशोरी अमोणकर यांचे गायन विशेष आवडीचे आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT