NCP Spokesperson Nawab Malik About Postponement of Congress NCP Meeting
NCP Spokesperson Nawab Malik About Postponement of Congress NCP Meeting 
मुख्य बातम्या मोबाईल

...म्हणून झाली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक रद्द

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात सरकार स्थापनेबाबत शिवसेनेला द्यावयाचा पाठिंबा तसेच समान कार्यक्रम ठरवणे यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार होती. पण सकाळी होणारी ही बैठक अचानक रद्द करण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या.

मात्र, आज स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती असल्याने ही बैठक रद्द झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. ते म्हणाले, "उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी च्या नेत्यांची बैठक होईल. या बैठकी नंतर घटक पक्षांशी चर्चा केली जाईल. सकारात्मक चर्चा झाली की सेनेच्या नेत्यांशी चर्चा होऊ शकते. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी आमच्या सकारात्मक चर्चा सुरू आहेत,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT