meher
meher 
मुख्य बातम्या मोबाईल

`रेमडेसिव्हर` इंजेक्शनसाठी कोरोना बाधीत उतरले रस्त्यावर

सरकारनामा ब्युरो

नाशिक : बेड आणि `रेमडेसिव्हर`साठी प्राणवायू घेऊन कोरोना बाधीतांना आंदोलनाची वेळ आली आहे. शहरात आता इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. पहाटेपासून पाच - सात तास रांगा लावूनही रेमडेसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याने संयम सुटलेल्या कोरोना बाधीतांच्या नातेवाईकांनी आज रस्त्यावर उतरुन आंदोलन केले.

रास्ता रोको आंदोलनाच्या प्रयत्नातील नातेवाईकांनी उन्हात मेहेर चौकात जोरदार घोषणाबाजी करीत रोष व्यक्त केला. त्यातील एक जण रस्त्यावर कोसळला.

नाशिकला काही दिवसांपासून रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळा बाजार सुरु असल्याचा आरोप आहे. रुग्णालयात अव्वाच्या सव्वा दराने मिळणारे इंजेक्शनसाठी पहाटे पाचपासून रुग्णांच्या नातेवाईकांना पाच तास रांगा लावून इंजेक्शन मिळत नाही. उत्तर महाराष्ट्रातील विविध गावातून लोक रात्री नाशिकला येउन भल्या पहाटेपासून रांगा लावून बसतात. मात्र त्यातील अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागते. अशा संतप्त नागरिकांचा आज संयम ढळला आणि त्यांनी मेहेर चौकात सकाळी अकराला रास्ता रोको आंदोलन सुरु केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत आंदोलकांना बाजूला केले मात्र पालकमंत्री, आमदार खासदारांना भेटायचेच असा आग्रह धऱीत जागेवर जोरदार घोषणाबाजी करीत. आंदोलकांनी पालकमंत्री छगन भुजबळ किंवा महापालिका आयुक्तांना भेटल्याशिवाय जाणार नाही अशी भूमिका घेत घोषणाबाजी करीत, भर दुपारी बाराला भर उन्हात ठाण मांडले.

आंदोलकापैकी सगळ्यांचे नातेवाईक ठिकठिकाणी कोरोनाचे उपचार घेत आहे. त्या सगळ्यांना तेथील डॉक्टरांनी रेमडेसिव्हरच्या प्रस्क्रिप्शन दिल्या आहेत. रुग्णालयात अव्वाच्या सव्वा दराने मिळणाऱ्या १२०० रुपयांच्या इंजेक्शनसाठी मेहेर चौकातील गोळे कॉलनीसह ठिकठिकाणच्या मेडीकल दुकानात पहाटे पाच पासून रुग्णांचे नातेवाईक रांगा लावून असतात. सकाळी अकरापर्यत त्यातील ज्यांना इंजेक्शन मिळतात तर अनेकांना रिकाम्या हाताने परत माघारी फिरावे लागते. अशातच आज इंजेक्शन न मिळालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी निराश होउन संयम सुटल्यानंतर आज हे आंदोलन केले.

चौघे रुग्णालयात पाचवा रस्त्यावर
निफाड तालुक्‍यातील प्रशांत गवळी याच्या कुटुंबातील आई-वडील आणि भाउ भावजय असे चौघे पॉझिटीव्ह आहे. घऱातील पाचवा युवक आज नाशिकला इंजेक्शनसाठी आला होता. त्याला इंजेक्शन मिळाले नाही. पहाटेपासून रांगेत उभा राहिल्यानंतर सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यचा संयम सुटला आणि तो रस्त्यावर कोसळला. अखेर मेहेर चौकात वार्तांकनासाठी असलेल्या उपस्थित पत्रकारांनी पाणी देत सावलीत बसविले.
....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT