Remdesivir injection in surat bjp office criticised by congress and aap
Remdesivir injection in surat bjp office criticised by congress and aap 
मुख्य बातम्या मोबाईल

सामान्यांचे हाल होत असताना भाजपकडून रेमडेसिविरचा साठा

वृत्तसंस्था

सूरत : रेमडेसिविर इंजेक्शनसाठी सर्वसामान्य नागरिकांचे देशभरात हाल होत आहेत. पुरेसा साठा नसल्याने तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. पण दुसरीकडे भाजप कार्यालयातच रेमडेसिविरचा साठा केला जात असल्याचे समोर आल्याने विरोधकांकडून भाजपवर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. सोशल मीडियावरही भाजपला टीकेचे लक्ष्य करण्यात आले आहे. 

भाजपच्या सूरतमधील कार्यालयातून रेमडेसिविर मोफत देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सुमारे पाच हजार इंजेक्शनचे वाटप केले जाणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी केली आहे. कार्यालयात इंजेक्शनच्या बॅाक्स, नागरिकांच्या कार्यालयाबाहेरील रांगेचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सूरतमधील भाजप कार्यालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे. इंजेक्शनसाठी डॅाक्टरांची चिठ्ठी आणि कोरोना रिपोर्ट असणे आवश्यक आहे. 

अनेक मित्रांनी ही इंजेक्शन खरेदी केली आहेत. बाजारभावाप्रमाणे त्याची खरेदी करून भाजपकडून वितरीत केली जात आहेत. आम्ही पाच हजार इंजेक्शनचे वितरण करण्याचे ठरविले आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे. यावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे. सर्वसामान्य लोकांना एका इंजेक्शनसाठी तासन् तास रांगेत उभे राहावे लागत असताना भाजपला एवढी इंजेक्शन कशी मिळाली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित छावडा म्हणाले, भाजपने इंजेक्शनचा साठा केला आहे. इंजेक्शनचा कमी पुरवठा होत असताना भाजपला एवढी इंजेक्शन मिळतात. तसेच इंजेक्शनचा साठा करणे किंवा त्याचे वितरण राजकीय पक्षाला करण्याची परवानगी नाही. त्यामुळे भाजपने कायद्याचेही उल्लंघन केले आहे. यावर सरकार कारवाई करणार का? कायदा फक्त किरकोळ विक्रेत्यांसाठीच आहे का?, असे अनेक प्रश्न छावडा यांनी उपस्थित केले आहेत. 

आपने भाजपला धारेवर धरले आहे. ''खरे गुजरात मॅाडेल. सरकारी रुग्णालयांत रेमडेसिविर मिळत नाही. मात्र, सूरत भाजप कार्यालयात इंजेक्शन मिळत आहे,'' असे ट्विट करून आपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाळ इतालिया यांनी टीका केली आहे. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी भाजपच्या या उपक्रमावरून टोला लगावला आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT