bp9.jpg
bp9.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये घुमला शेतकरी आंदोलनाचा आवाज...

सरकारनामा ब्युरो

लंडन : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद ब्रिटनच्या संसदेत उमटले. ब्रिटनच्या मजूर पक्षातर्फे सह्याची मोहिम राबविण्यात आली. त्यानंतर कृषी कायद्या रद्द करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारवर दबाब आणण्यासाठी आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याविषयी या संसदेत चर्चा झाली. 

बोरिस जॉन्सन सरकारने नरेंद्र मोदी यांचे समर्थन करीत 'कृषी कायदा या विषय भारताचा अंतर्गत विषय आहे. त्यावर परदेशातील संसदेत चर्चा होऊ शकत नाही,' असे स्पष्ट केलं. कृषी कायद्याचे समर्थन बोरिस जॉनसन सरकारने केले आहे. 

बोरिस जॉन्सन सरकारमधील मंत्री निगेल एडम्स यांनी सांगितले की, कृषी कायद्या हा विषय भारताचा अंतर्गत विषय आहे. याबाबत ब्रिटनचे मंत्री आणि अधिकारी भारतातील अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत. याबाबत मोदी सरकार आणि शेतकरी यांच्यात लवकर सकारात्मक तोडगा निघेल.  

यापूर्वी ब्रिटनच्या संसदेत शेतकरी कायद्याबाबत अनेक वेळा काही विषयांची चर्चा करण्यात आली आहे. प्रत्येक वेळी पंतप्रधान बोरिस जाँनसन यांनी मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

मजूर पक्षाचे खासदार तनमनजीत सिंह धेसी यांच्या नेतृत्वाखाली 36 ब्रिटीश खासदारांनी कृषी कायद्याच्या विरोधात होत असलेल्या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी पक्षाचे सचिव डोमिनिक राब यांना याबाबत पत्र लिहिले आहे. दिल्ली येथे शंभर दिवसापासून कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. शेतकरी हे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत.

हेही वाचा : अण्णाद्रमुक-भाजपला धक्का; अभिनेता विजयकांतच्या पक्षाने सोडली साथ
 
चेन्नई : विधानसभा निवडणुकीच्या महिनाभर आधीच तमिळनाडूतील अण्णाद्रमुक व भाजप आघाडीला जोरदार झटका बसला आहे. अभिनेते विजयकांत यांच्या डीएमडीके या पक्षाने आघाडीची साथ सोडली आहे. अपेक्षित जागा न मिळाल्याने नाराज झालेल्या विजयकांत यांनी आघाडी न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. तमिळनाडूमध्ये १८ एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुक व भाजपची आघाडी झाली आहे. या आघाडीत भाजपच्या वाट्याला केवळ २० जागा आल्या आहेत. अभिनेते विजयकांत यांच्या डीएमडीके या पक्षाशीही जागावाटपबाबत चर्चा सुरू होती. पण एआयडीएमकेने विजयकांत यांची मागणी मान्य केली नाही. त्यांनी अवास्तव जागा मागितल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. त्यामुळे विजयकांत यांनी आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तमिळनाडूमध्ये २०१४ च्या निवडणुकीत एआयडीएमकेने ३९ पैकी ३७ जागा जिंकल्या होत्या.  


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT