Robert vadra rides bicyle to protest against prtrol price hike
Robert vadra rides bicyle to protest against prtrol price hike 
मुख्य बातम्या मोबाईल

सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वड्रा एसी कारवरून आले सायकलवर...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई व उद्योजक रॉबर्ट वड्रा हे इंधन दरवाढीविरोधात मैदानात उतरले आहेत. आज एसी कारऐवजी सायकवरवरून कार्यालय गाठत त्यांनी इंधन दरवाढीकडे लक्ष वेधले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एससी कारमधून बाहेर पडून लोकांचे हाल पाहावेत, अशी टीकाही त्यांनी केली.

मागील काही दिवसांपासून पेट्रोलसह डिझेल व गॅसचे दरही सातत्याने वाढत आहेत. काही शहरांमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०० वर पोहचले आहेत. त्यामुळे देशभरात काँग्रेससह विरोधी पक्षांनी इंधन दरवाढीवरून जोरदार टीका सुरू केली आहे. तसेच ठिकठिकाणी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलनही केले जात आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढत असल्याने तसेच इंधर दरांवर केंद्र सरकारचे नियंत्रण नसल्याचे सांगत केंद्र सरकारने हात वर केले आहेत.

आता रॉबर्ट वड्रा हेही मैदानात उतरले आहेत. आज ते दिल्लीतील खान मार्केटपासून त्यांच्या कार्यालयापर्यंत सायकलवरून गेले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधानांनी एसी कारमधून बाहेर पडत सामान्यांचे हाल पाहावेत. हा त्रास पाहून तरी ते इंधनाचे दर नियंत्रित करतील. आधीच्या सरकारवर ते इंधन दरवाढीचे खापर फोडत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मध्य प्रदेशातील काही काँग्रेस आमदारांनीही आज सायकवरवरून विधानभवन गाठले.

दरम्यान, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनीही आज ट्विटरवरून केंद्र सरकारवर टीका केली. ''कारमध्ये पेट्रोल भरत असताना वेगाने पुढे जाणाऱ्या मीटरवर तुमची नजर जाईल, तेव्हा लक्षात ठेवा की, कच्च्या तेलाचे भाव वाढले नाहीत, उलट कमी झाले आहे. पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटर आहे. तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचे काम मोदी सरकार मोफत करत आहे,'' अशी टीका गांधी यांनी केली आहे. 

सोनिया गांधी यांनीही रविवारी पंतप्रधान मोदी यांना इंधन दरवाढीबाबत पत्र लिहिले आहे. ''सध्याचे इंधनाचे दर विक्रमी पातळीवर पोहचले असून ते अव्यवहारिक आहेत. वेगाने वाढणारी महागाई, अत्यावश्यक वस्तूंच्या वाढत जाणाऱ्या किंमतींमुळे महागाईचे संकट अधिक गंभीर बनले आहे. पण अशा संकटाच्या वेळी भारत सरकार लोकांच्या समस्या दूर करण्याऐवजी त्यांच्या अडचणींत भर टाकून नफेखोरी करत आहे,'' अशी टीका त्यांनी केली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT