Anil Parab
Anil Parab 
मुख्य बातम्या मोबाईल

अनिल परब यांच्यावर टाकलेला `आरटीओ`बाँब झाला फुस्स!

सरकारनामा ब्युरो

नाशिक : निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार (Suspended RTO inspector Gajendra Patil blaim corruption in Transfers) नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कुठल्याही प्रकारचा गुन्हा घडला नसल्याचा अहवाल (Inquiry report submitted that crime is not took place in nashik limit) नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey) यांनी पोलिस महासंचालकांकडे सादर केला आहे. निलंबित पाटील यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासंदर्भात केलेल्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे यातून स्पष्ट झाले.

प्रादेशिक परिवहन विभागातील निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी विभागात होत असलेल्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, बदल्यांमधील आर्थिक व्यवहार, अनियमितता याबाबत पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता. या अर्जाची दखल घेत पोलिस आयुक्त पांडे यांनी उपायुक्त बारकुंड यांना या तक्रार अर्जावरून चौकशी करीत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या.

चौकशीच्या अनुषंगाने श्री. बारकुंड यांनी गजेंद्र पाटील यांचा जबाब नोंदविला. या वेळी पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून श्री. बारकुंड यांनी राज्यातील परिवहन प्रादेशिक परिवहन विभागाचे आयुक्त, उपसचिव, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक यांच्यासह अकरा जणांचे जबाब नोंदविले.

या तक्रारीची व्याप्ती पाहता चौकशी अहवाल सादर करण्यास श्री. बारकुंड यांना दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. अधिकाऱ्यांच्या जबाबात तपासी पथकाने पोलिस आयुक्तालयात सादर कागदपत्रांची शहानिशा केली. अखेर या प्रकरणात चौकशी करून श्री. बारकुंड यांनी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे अहवाल सादर केला. निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत असा कुठल्याही प्रकारचा गुन्हा घडला नसल्याचे अहवालात नमूद केले आहे.
....

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT