Seema Tajne F
Seema Tajne F 
मुख्य बातम्या मोबाईल

भाजप नगरसेवकांच्या रंगताहेत पक्षांतराच्या चर्चा !

सरकारनामा ब्युरो

नाशिक : नाशिक रोडच्या प्रभाग समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दगाफटका (Nashik Road NMC Chairmen election bjp faced anti party activity) झाल्यानंतर नगरसेविका सीमा ताजणे व नगरसेवक विशाल संगमनेरे या दोन अनुपस्थित नगरसेवकांबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. (Now there were rumoors of seema tajne & Vishal sangamnere`s secession) या दोन नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी होणार की ते शिवसेनेत जाणार, (whether they joines Shivsena) याबाबत नाशिक रोड परिसरात चर्चा घडत आहे. 

प्रभाग १८ मध्ये नगरसेविका मीरा हांडगे यांचे पुत्र सचिन यांनी नाशिक रोड प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत दगाफटका झाला म्हणून या दोन नगरसेवकांना अप्रत्यक्षरीत्या पोस्टरबाजी करून विरोध दर्शवला आहे. हांडगे यांचा विरोध विशाल संगमनेरे यांनाच असल्याचे बोलले जाते. प्रभाग १८ मधील भाजपचे दोन नगरसेवक आमने-सामने आल्यामुळे नाशिक रोडमधील हांडगे यांनी लावलेला हा बोर्ड लक्षवेधी ठरत आहे. 

दुसऱ्या बाजूला भाजपच्या प्रभाग २० च्या नगरसेविका डॉ. सीमा ताजणे यांनी प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुकीत अनुपस्थित राहिल्यामुळे त्या शिवसेनेत जातील, अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी बिटको रुग्णालयाची केलेली तोडफोड म्हणजे भारतीय जनता पक्षाला घरचा आहेर समजला जात आहे. त्यामुळे ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा नाशिक रोडमध्ये सुरू आहे. मित्रमेळा संघटनेच्या माध्यमातून त्यांचा दबावगट सुप्तावस्थेत सक्रिय झालेला दिसून येत असल्यामुळे ताजणे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. 

...
पक्ष बदलण्याचा विचार मी अजून केलेला नाही. माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मी निवडणुकीला उपस्थित राहू शकले नाही. जनमताचा आधार घेऊनच मी पुढील वाटचाल करेल. 
- डॉ. सीमा ताजणे, नगरसेविका, प्रभाग २० 
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT