0Sarkarnama_20Banner_20_202021_04_20T220856.401.jpg
0Sarkarnama_20Banner_20_202021_04_20T220856.401.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

"सामना"ने छापला मोदी जबाबदार नसल्याचे सांगणारा भाजपचा लेख..  

सरकारनामा ब्युरो

मुंबई  :  युतीत असताना आणि नसताना टीका करणाऱ्या सामनाने  आपल्या संपादकीय पानावर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कैातुक करणारा लेख छापला आहे. शिवाय आज " सामना" च्या पहिल्या पानावर 'पंतप्रधान मोदी भावुक झाले ,वाराणसीतील डॉकटरांशी संवाद साधताना त्यांचा कंठ दाटला' अशीही बातमी ठळकपणे प्रसिध्द झाली आहे. या दोन महत्वाच्या बाबींचा काय अर्थ लावायचा असा प्रश्न राजकीय वर्तुळाला पडला आहे. Saamana BJP article saying that Modi is not responsible to Corona
 

"पंतप्रधानांना दोषी का ठरवता" असे शीर्षक असलेला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लिहिलेला हा लेख आज प्रसिद्ध झाला आहे. पंतप्रधानांवरील आरोपांना उत्तर अशी चौकट करून शेजारीच उपाध्येंचा लेख छापला आहे. "पंतप्रधानांनी सर्व राज्यांना योग्य त्या सूचना पाठवल्या होत्या. काळजी घेतली होती तरीही ते एकटेच जबाबदार कसे," असा प्रश्न या लेखात विचारला आहे. 

केंद्र सरकार कधीच गाफील नव्हते, नरेंद्र मोदी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी नियमित संपर्क साधून स्थितीचा आढावा घेत असतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता हळूहळू कमी होत आहे. आणखी पंधरा-वीस दिवसांत परिस्थित आणखी आटोक्यात येईल, अशी चिन्हे आहेत. या निमित्ताने येनकेन प्रकारे मोदी सरकारवर टीका करीत राहणे हेच काहीजणांचे सध्या प्रमुख कार्य झाले आहे. दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने मोदी सरकारला घेरण्याची नेपथ्यरचना देशातील आणि देशाबाहेरील मोदीविरोधकांनी केली, असे उपाध्ये यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.
 
हेही वाचा  : मोदींच्या तक्रारीनंतर लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचे ट्विटर अकाउंट ब्लॉक... 

 
नवी दिल्ली :  राष्ट्रीय जनता दलाचे RJDचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी दोन दिवसापूर्वी भाजपचे नेते सुशील मोदी  यांच्यावर टि्वटरच्या माध्यमातून हल्लाबोल केला होता. यावरुन टि्वटरने रोहिणी आचार्य rohini acharya यांचे अंकाउट बंद केले आहे. याबाबत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार  सुशील मोदींच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत सुशील मोदींनी टि्वट करीत ही माहिती दिली आहे.   राष्ट्रीय जनता दलाचे नेता तेजस्वी यादव Tejashwi Yadav यांच्या सरकारी निवासस्थानावर कोविडचे रुग्णालय सुरु आहे. यावर बिहारमध्ये विरोधकांनी टीका केली आहे. भाजपचे नेते, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी (Sushil Modi) यांनी या सर्व प्रकारला राजकीय नाट्य असल्याचे म्हटले होते. मोदींनी तेजस्वी यादव यांच्या एमबीबीएस  दोन्ही बहिनींवर टीका केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT