मुख्य बातम्या मोबाईल

धनगर आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी सनगरही सरसावले! 

सरकारनामा ब्युरो

फलटण : आरक्षणाबाबत सरकारला जाग आणण्यासाठी जागरण, गोंधळ, गजीनृत्य, ढोल नादाच्या माध्यमातून आवाज उठविला जाईल, असे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने सांगण्यात आले. 

धनगर समाजाचे फलटण येथील अधिकार गृह इमारतीसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून त्यास समाज बांधवांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. 

आज सकाळी कोळकी ग्रामस्थांनी तसेच अखिल भारतीय सनगर समाज सेवा संस्था या संघटनेचे अध्यक्ष भरतशेठ राऊत, विजय मायणे, अमोल राऊत, तसेच जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस व इतर संघटनांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनास पाठींबा दिला. 

सरकारने जाहीर केलेले 93 हजार धनगडांमधील एकतरी "धनगड' एका महिन्यात दाखवावा अन्यथा परिणामाला सामोरे जावे असा इशारा धनगर समाजाकडून देण्यात आला आहे. राज्यातील दीड कोटी धनगर समाजाला गेल्या 70 वर्षांपासून आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी अस्तित्वात नसलेली धनगड आदिवासी जमात उभी करुन या समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे, असा आरोप कृती समितीने केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT