Sanjay Raut .jpg
Sanjay Raut .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

भाजप परग्रहावरील लोकांवरही गुन्हे दाखल करु शकतो!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्यानंतर गुन्हा दाखल होतो. त्यामध्ये पक्षाची काही भूमिका असण्याचे कारण नाही. विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना निनावी पत्र आले तेव्हा त्या लोकांना अटक झाली होती. राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री यांना कोणिही धमकी दिली तर त्यांच्यावर कारवाई होतेच असे, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. (Sanjay Raut criticizes BJP)     

राऊत मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, सरकारने नारायण राणे यांच्यावर सुडाने कारवाई केली का. त्यावर राऊत म्हणाले, सुडाने कारवाई करण्यासाठी आमच्याकडे इडी किंवा सीबीआय नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ज्या कारवाया सुरु आहेत. त्याला सुडबुधीने केलेली कारवाई म्हणतात, असा टोला त्यांनी भाजला लगावला आहे. 

परिवहन मंत्री अनिल परब यांची क्लिप व्हायरला झाली होती. त्यावर बोलताना राऊत म्हणाले. सरकारला पोलिसांना सांगण्याचा अधिकार आहे. मी क्लिप बघीतली नाही. मात्र, ते पालकामंत्री आहेत. त्यामुळे ते आदेश देऊ शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि सरकार मधील प्रत्येक मंत्री हा सरकार आहे. भाजप कोणावरही गुन्हा दाखल करु शकतो. त्यांच्या हातात यंत्रणा आहे, ते परग्रहावरच्या माणसावरही गुन्हा दाखल करु शकतात. 

सरकार पाडण्याचे प्रयत्न करत रहा, असे आवाहान त्यांनी विरोधकांना दिले आहे. शिवसेनेवर टीका होणार, ज्यांना मोठे व्हायचे आहे त्यांच्याकडे दुसरे भांडवल कोणते आहे. त्यासाठीच तुम्हाला मंत्रिपदे दिली जातात, असा टोला त्यांनी राणे यांना लगावला. शिवसेनेवर टीका केली तर आम्ही त्याचे स्वागत करतो. मात्र, अशी टीका असू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणत होते, राजकारणात दोन देण्याची आणि दोन घेण्याची तयारी असली पाहिजे, असेही राऊत यांनी सांगितले.  

तुम्ही केंद्रीय मंत्री आहात तुम्ही देश समजुन घ्या, येथे येऊन बकाल बडबड करण्यासाठी खाते नाही. आमच्या आंगावर याल तर ही शिवसेना आहे. आम्ही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी राणे यांना दिला. मी सामनाचा कार्यकारी संपादक आहे. त्या संपादकीयची जबाबदारी माझी आहे, असेही ते म्हणले. विधायक टीकेचे प्रत्येकाने स्वागत केले आहे. आम्ही टिकेला घाबरत नाही. कर नाही त्याला डर कशाला, असेही राऊत म्हणाले.   

महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही म्हणजे काय, तिथे तुमचा पराभव झाला आहे. हे लक्षात घ्या. लाल, बाल, पाल, हे त्रीशूल आहे. हे लक्षात घ्या. आणि त्यातील त्रीशूलाचे एक टोक तुमच्यात घुसले आहे. एखाद्या राज्याचा अपमान कराल तर देश तुम्हाला माफ करणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT