मुख्य बातम्या मोबाईल

`हम शतरंज में कुछ ऐसा कमाल करते हैं...'

सरकारनामा ब्युरो

पुणे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेनेच्या विजयाचे वर्णन हटक्या शैलीत केले आहे.

खासदार राऊत यांनी बुद्धिबळासंदर्भातील एक शेअर ट्विट करीत शिवसेनेच्या विजयाचे वर्णन केले आहे. `आम्ही बुद्धिबळाचा डाव असा काही खेळतो, की आमचे प्यादेच राजावर मात करते,' अशा आशयाचे ट्विट खासदार राऊत यांनी केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महिना उलटून गेला तरी सत्तेचा खेळ सुरूच होता. अखेर शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि मित्रपक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांची निवड झाली आणि काल त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 

शिवसेनेची कणखरपणे बाजू मांडण्याचे काम खासदार राऊत यांनी नेहमीच केले आहे. आजही ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या या विजयाचे वर्णन आपल्या स्टाईलमध्ये केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT