Sunil Dattu Devre
Sunil Dattu Devre 
मुख्य बातम्या मोबाईल

सरपंच लिलाव प्रकरण... मी तर साधारण व्यक्ती दोन कोटी देऊ शकतो?

संपत देवगिरे

नाशिक  : सरपंचपदाचा लिलाव 2.05 कोटींना झाला, यामुळे उमराणे (देवळा) ग्रामपंचायतची निवडणूक आयोगाने रद्द केली. त्यानंतर या गावात वेगळ्याच प्रतिक्रीया उमटल्या. लिलाव घेतल्याची चर्चा असलेले सुनिल दत्तू देवरे यांनी चक्क हात झटकले आहेत. ते म्हणाले,तो लिलाव नव्हता. मी साधारण व्यक्ती. दोन कोटींची मालमत्ताही नाही तर सरपंचपदासाठी 2.05 कोटी कसे देऊ शकतो?.

निवडणुका बिनविरोध करण्यासाठी विविध आमदार निधी देण्याची घोषणा करीत आहेत. मात्र उमराणे (देवळा) येथे निवडणुकीला फाटा देत चक्क सरपंचपदाचा लिलाव झाला होता. कांदा बाजारपेठ असलेल्या संपन्न गावात सरपंच पदाच्या लिलावाची बोली एक कोटी 11 लाखांपासून सुरु झाली. त्यात सुनील दत्तू देवरे यांनी दोन कोटी पाच लाखांची बोली देऊन सरपंचपद पटकावले असा व्हीडीओ व्हायरल झाला होता. त्याची एव्हढी चर्चा झाली की, राज्य निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली. जिल्हाधिका-यांकडून अहवाल मागविला. त्या अहवालात जिल्हाधिकारी यांनी लिलाव झाल्याच्या वृत्ताची पृष्टी केली होती. त्यामुळे उमराणे (ता. देवळा) ग्रामपंचायत निवडणूक रद्द करण्यात आली. दुस-या टपप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. 

यासंदर्भात या बहुचर्चीत लिलावात दोन कोटींची बोली लावणारे सुनिल दत्तू देवरे म्हणाले, हा सर्व गैरसमज आहे. मी एक साधारण व्यक्ती आहे. माझ्याकडे दोन कोटींची मालमत्ता देखील नाही. मग दोन कोटी रुपये कसे देणार?. राज्य आयोगानेच निवडणूक थांबवल्याने त्यांच्यापुढे कोण व कसे बोलणार?. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य आहे. 

खरे तर उणराणे ग्रामपंचायतची निवडणूक ठरल्याप्रमाणे 17 पैकी 15 जागांवर बिनिवरोध झाली होती. दोन जागांवर उमेदवारांनी माघार घेतली नाही. त्यामुळे लिलावाविषयी सुनिल देवरे म्हणाले, आमच्या गावात रामेश्वरांचे मंदिर आहे. त्याचा जिर्णोद्धार आठ- दहा वर्षांपासून सुरु आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाकडून अकरा हजार याप्रमाणे 3.60 कोटींची निधी संकलीत होणर होता. त्यासाठी ग्रामसभा झाली. त्यात निधी संकलनाचे काम माझ्यासह नंदन राजे, समीर पांडूरंग, दिलीप केशव, प्रशांत देवरे, खंडू पंडीत देवरे, विलास मनोहर देवरे या प्रमुखांवर सोपवले होते. त्यात घऱटी अकरा हजार याप्रमाणे सर्वाधीक घरांची जबाबदारी मी घेतली होती. ती  रक्कम 2.05 कोटी होते. मंदिराची वर्गणी म्हणून तो निधी होता. तो मी फक्त संकलीत करणार होतो. मी स्वतः देणार नव्हतो. हे त्यातील वास्तव आहे. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT